Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics: सोलापूर शहर दक्षिण जागेचा तिढा सुटला; पण, माजी आमदाराच्या पोस्टनं वाढवलं आघाडीच्या नेत्याचं टेन्शन

Solapur South Assembly Constituency: "आपल्याला आजवर मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि विश्वास कायम ठेवत,आपण आहे त्यापेक्षा जास्त जोमाने आपला प्रचार सुरूच ठेवूया..! चला,परिवर्तन घडवूया..!" असे दिलीप माने यांनी म्हटलं आहे.

Mangesh Mahale

Maha Vikas Aghadi News: महाविकास आघाडीतील जागा वाटपाची पहिली यादी जाहीर झाली आहे. सोलापूर शहर दक्षिण जागेचा तिढा सुटला आहे. आघाडीतून सोलापूर शहर दक्षिणची जागा शिवसेना ठाकरे गटाला दिली आहे. सोलापूर शहर दक्षिण मधून ठाकरे गटाचे नेते अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमर पाटील यांना बी फॉर्म दिला आहे. शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील यांचे अमर पाटील हे पुत्र आहेत. अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार दिलीप माने यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

"आपल्याला आजवर मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि विश्वास कायम ठेवत,आपण आहे त्यापेक्षा जास्त जोमाने आपला प्रचार सुरूच ठेवूया..! चला,परिवर्तन घडवूया..!" असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दिलीप माने हे काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदारआहेत.

"माझा काँग्रेस पक्ष,त्याचे नेतृत्व आणि काँग्रेसच्या विचारधारेवर संपूर्ण विश्वास आहे.आपल्या काँग्रेसचा पारंपरिक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे आणि तो आपणच लढणार आहोत..!" असे त्यांनी ठामपणे म्हटलं आहे. अशी पोस्ट शेअर करत विधानसभा निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

काल (बुधवारी) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमर पाटील यांना एबी फॉर्म दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. आता माजी आमदार दिलीप माने आणि अमर पाटील यांच्या दोघात महाविकास आघाडीकडून कोणाची उमेदवारी कायम राहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेना उपनेते शरद कोळी आणि संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांनी दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी ताकद लावली होती. सोलापूर शहर दक्षिण मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात लढत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT