Dilip Mane-Siddheshwar Avtade-Baliram Sathe
Dilip Mane-Siddheshwar Avtade-Baliram Sathe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा दूध संघ निवडणूक : दिलीप माने, बळीराम साठे, आवताडेंच्या अर्जाचे काय होणार?

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर (solapur) जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस चुरस वाढत आहे. मोहोळ तालुक्‍यातील 47 दूध संस्थांना मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. दुसरीकडे क्रियाशील सभासदांमधून निवडल्या जाणाऱ्या 12 जागांमध्ये नाव नसतानाही अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारी अर्जाचे काय होणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Solapur District Dudh Sangh Election: What will happen to Mane, Sathe, Avtade applications?)

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या प्रधान कार्यालयात उद्या (सोमवार, ता. 31 जानेवारी) सकाळी 11 पासून होणाऱ्या उमेदवारी अर्ज छाननीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe), मंगळवेढ्यातील युवा नेते सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह अनेकांनी नाव नसतानाही क्रियाशील सभासदांमधून संचालक होण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. क्रियाशील सभासदांमधून दूध संघाचा संचालक होण्यासाठी व येथून निवडणूक लढविण्यासाठी फक्त 56 दूध संस्था पात्र ठरल्या आहेत.

पात्र ठरलेल्या 56 संस्थांमध्ये माजी आमदार माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष साठे, युवानेते अवताडे यांचा समावेश नाही. या तीनही नेत्यांचा ठराव ज्या दूध संस्थेतून झाला आहे, त्या संस्थेचा समावेश क्रियाशिल सभासदांच्या यादीत नाही. त्यामुळे उद्याच्या छाननीमध्ये या तीन नेत्यांसह अन्य अर्जांवर हरकती/आक्षेप येण्याची दाट शक्‍यता आहे. या आक्षेपातून निवडणूक निर्णय अधिकारी कसा मार्ग काढणार?, उमेदवारी दाखल करताना या तीनही नेत्यांनी कायद्याच्या कोणत्या तरतुदीचा/निकालाचा आधार घेतला आहे? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

१५ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत

जिल्हा सहकारी दूध संघाच्या 17 जागांसाठी 133 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनेकांनी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दाखल झालेल्या सर्व उमेदवारी अर्जावर उद्या (सोमवार) छाननी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर छाननीमध्ये वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी मंगळवारी (ता. 1 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या कार्यालयात (जिल्हा उपनिबंधक कार्यालय) प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 1 ते 15 फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT