सोलापूर : इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारच्या विरोधात कॉग्रेसने आज आंदोलन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विरोधात आंदोलकांनी घोषणी दिल्या. कॉग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदेंसह जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (Dhawalsingh Mohite Patil), माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre), शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना नियमाचा भंग केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कलम 188 प्रमाणे आंदोलकांवर दाखल करण्यात आला आहे. आंदोलन करुन गर्दी जमवल्याप्रकरणी कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदेसह (Praniti Shinde) १५ जणांवर सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांची माहिती दिली.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात इंधन आणि गॅस सिलेंडर सह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भ्रष्टाचार, अपुरा आणि आठ दिवसाआड पाणी पुरवठा, चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामे, मोदी सरकारकडून रोजच होत आलेली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दरवाढ, प्रचंड महागाई, कॉंग्रेस पक्षाने कोव्हिड काळात केलेली कामे हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून शहर उत्तर मध्ये संघटना मजबूत करण्याचे आवाहन प्रणिती शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.