Vishal Phate Scam News
Vishal Phate Scam News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Phate Scam : 'अब तक 99'! फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta)अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या विरोधातील तक्रारींचा ओघ थांबत नसल्याचे चित्र आहे. फटेविरोधातील तक्रारींची संख्या वाढत असून, त्याने फसवणूक केलेल्या रकमेचा आकडाही वाढत आहे. शेअर बाजाराच्या (Share Market) माध्यमातून जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणारा हा सध्या पोलीस (Police) कोठडीची हवा खात आहे. (Vishal Phate Scam)

शेअर बाजाराच्या (Share Market) माध्यमातून जादा पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फटेने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. फटे याने बार्शीत विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि., जे. एम. फायनान्सियल सर्व्हिसेस आणि अलका शेअर सर्व्हिसेस या तीन कंपन्यां स्थापना केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून त्याने गुंतवणूकदारांना जादा पैशांचे अमिष दाखविले. सुरवातीला काही महिने त्याने गुंतवणुकदारांना परतावा दिला. नंतर त्याने गुतंवणूकदारांना परतावा न देता त्यांना गंडा घातला. (Vishal Phate News)

विशाल फटे याने बार्शीसह राज्यभरात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. फटे विरोधातील तक्रारींचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत 99 जणांनी तक्रार दिलेली आहे. यामुळे फसवणुकीचा आकडाही वाढून 20 कोटी रुपयांवर पोचला आहे. फटेने फसवणूक केल्याप्रकरणी पुढे आलेले बहुतांश गुंतवणूकदार हे बार्शीतील आहेत. तसेच, उस्मानाबाद आणि पुण्यातील काही जणांचाही समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखा या तक्रारदारांच्या कागदपत्रांची तपासणी करुन फसवणुकीची आकडा निश्चित करीत आहे.

विशाल फटे (Vishal Phate Scam) याने बार्शीतीलच (Barshi Scam) नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. फटेविरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी फिर्यादी दीपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी वडील व भावाला अटक केल्यानंतर विशाल फटे पोलिसांना शरण आला होता. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT