Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'एसटी कर्मचाऱ्यांना कोणी तरी भडकवतयं'

महाराष्ट्र ( Maharashtra ) राज्य परिवहन महामंडळाच्या ( S.T. ) कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू आहे.

Amit Awari

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत विलिनीकरण करून घेण्याची मागणी जोर धरत आहे. 38 एसटी कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. या मुद्द्यावर भाजपचे नेते महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 'Someone is provoking ST employees'

जामखेड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अजित पवार बोलत होते. या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

एसटी कर्मचारी आंदोलन आक्रमक होत असल्याने अजित पवार म्हणाले, समाज कंटक तेढ निर्माण करतात. त्यामुळे दंगल होते. असा दंगलींचा फटका सर्वात प्रथम गरिबालाच बसतो. कृपया ही गोष्ट लक्षात घ्या. सध्या भावना भडकविण्याचे काम होत आहे. तरुणांचे रक्त सळसळते असेत. हे तरूण रक्त चुकीच्या पद्धतीने भडकविण्याचा प्रयत्न होत आहे. यात गरिबाचे नुकसान होते. जात-पात, नाते-गोते याचा विचार न करता माणुसकीचा विचार करून विकासाला साथ द्या.

अजित पवार पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना कोणी तरी भडकविण्याचे काम करत आहेत. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात प्रवाशांचे हितही पहावे लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मी, अनिल परब, अशोक चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे, असे त्यांनी सांगितले.

शुक्लकाष्ट मागे लावले जातेय

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, राज्य सरकारने कोरोना सारख्या मोठ्या संकटावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. बाजारपेठेची स्थितीही सुधारत आहे. काही लोकांकडून राज्य सरकारच्या मागे शुक्लकाष्ट लावण्याचे काम सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT