Maratha Protest Satara sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Maratha Protest : सातारा जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; कराडला कडकडीत बंद

Maratha Kranti Morcha मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली हाेती. त्याला जिल्ह्यासह कराडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Umesh Bambare-Patil

Jalana Maratha Protest : मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर जालना जिल्ह्यात पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. त्याला जिल्ह्यासह कराडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने, व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला.

जालना येथे मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी Police लाठीहल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोमवारी सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. त्याला सातारा Satara जिल्ह्यासह कराडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रामीण भागात जाणारी एसटी सेवा कराड आगारातून बंद ठेवण्यात आली आहे. तातडीच्या कामाला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी खाजगी वाहनाचा वापर केला. दरम्यान या जिल्हा बंदला कराड शहरासह तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. दुकानदार व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने व्यवसाय बंद ठेवून या बंदला पाठींबा दिला.

शाळा, कॉलेज आज बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र त्याची माहिती ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना मिळाली नाही. या बंदमुळे शाळा, कॉलेज बंद असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, त्याची माहिती ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांंचा आज विनाकारण त्यांचा हेलपाटा झाला.

फलटण येथे क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे दहा वाजता सुरु झालेले चक्काजाम आंदोलन अजुनही सुरु आहे. या चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडल्याने वाहतुक ठप्प झाली होती. याचबरोबर शहरातील चौकाचौकातही गटागटाने चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने चौकाचौकात काहीवेळ वाहतुक खोळंबल्याचे चित्र होते. फलटणमधील व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT