babanrao pachpute
babanrao pachpute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वेदनादायी, सरकार आर्यन खानला वाचविण्यात गुंतले'

संजय आ. काटे

श्रीगोंदे : संगमनेरमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यानंतर राज्यभर एसटी कर्मचारी आत्महत्येचे सत्र सुरू झाले. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला. असे असताना शेवगाव येथे आज पहाटे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. यावरून भाजपचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'S.T. Employees 'suicides painful, government involved in saving Aryan Khan'

आमदार पाचपुते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या आत्महत्येच्या बातम्या ऐकून मनाला अत्यंत वेदना होत आहेत. परिवहन महामंडळाचे कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत मात्र निगरगट्ट सरकारला त्यांचे घेणेदेणे नसून त्यांना आर्यन खान महत्वाचा आहे, असा आरोप करीत आमदार बबनराव पाचपुते यांनी आम्ही मात्रएसटी कर्मचाऱ्यांसोबत आहोत, असा दिलासा दिला.

पत्रकात पाचपुते पुढे म्हणाले, 28 ऑक्टोबरला राज्य एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटनांनी जे आंदोलन केले होते त्यात जो काही निर्णय झाला तो सर्व कामगारांना अमान्य आहे. त्यांची प्रमुख मागणी महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची आहे. परंतु त्याविषयी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संघटना विरहित बेमुदत कामबंद आंदोलन व उपोषण करीत आहेत.त्यांच्या आंदोलनाला श्रीगोंदे भाजपतर्फे पाठिंबा देण्यात आला.

पाचपुते म्हणाले की, या निगरगट्ट व अकार्यक्षम सरकारला सर्वसामान्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसून संपूर्ण महाआघाडी सरकार आर्यन खानला वाचवण्याच्या कामात गुंतले आहे. सरकारने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा गांभिर्याने विचार न केल्यास भाजपतर्फे सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन उभे केले जाईल.

यावेळी श्रीगोंदे भाजपतर्फे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, शहराध्यक्ष राजेंद्र उकांडे यांनी आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे पत्र वाहतूक अधीक्षक स्वप्निल आहेर यांच्याकडे दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT