ST Strike
ST Strike satara
पश्चिम महाराष्ट्र

एसटी संपास गालबोट; वाहकाने नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

सरकारनामा ब्युरो

सातारा : एसटीच्या वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केल्याची घटना साताऱा बसस्थानकात घडली आहे. वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वाद निर्माण झाला असून संपाच्या नवव्या दिवशी लागबोट लागले आहे.

साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला साताऱ्यात नवव्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. यावरून संपकरी कर्मचाऱ्यांनी त्यांना बस का घेऊन गेला, अशी विचारणा करत चापट मारली. तसेच संप चालू असल्याने कामावर जाऊ नये, अशी दमबाजी केली. यातून वादावादी झाली. त्याचे पर्यवसन मारहाणीत झाले.

सातारा आगारातील वाहक क्रमांक 6623 राजू पवार याने चिडून जाऊन वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड मारला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे बसस्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. मारहाण करणाऱ्या वाहकास पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT