Tarle Desai Supporters sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

देसाईंची बदनामी थांबवा; अन्यथा राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देणार....

सरकारनामा ब्युरो

तारळे : एकनाथ शिंदेसह आमचे नेते शंभूराज देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले बंड हे राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून केले आहे. हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे. यात राष्ट्रवादीने नाक खुपसू नये. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते सोशल मीडियातून मंत्री देसाईंची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. ती तातडीने थांबवावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शंभूराज युवा संघटनेचे तालुकाप्रमुख अभिजित पाटील यांनी येथे दिला.

तारळे विभागातील शिवसैनिकांच्या एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. संजय देशमुख, बबनराव शिंदे, विजय पवार, गजाभाऊ जाधव, नामदेवराव साळुंखे, रणजित शिंदे, सोमनाथ खामकर, एस. के. वागडोळे, एम. डी. जाधव, विकासराव जाधव, दीपक यादव, माणिक पवार, तुषार चव्हाण, किशोर बारटक्के, प्रणिल यादव, विश्वास खांडके आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले,‘‘ मंत्री देसाईंनी घेतलेल्या निर्णयात तारळे विभाग शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते एकमताने सोबत आहेत. दरम्यान, नेत्यांचा जयजयकार करून जोरदार घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. या वेळी विविध पदाधिकाऱ्यांनी बंडाच्या समर्थनार्थ मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरध्नीवरून कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, ''मी शिवसेनेतच आहे. आपण सर्व शिवसेनेतच आहोत. आपण सर्व कार्यकर्ते शिवसेनेत राहाणार आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा,'' असे आवाहन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT