कुडाळ : सभासद हा कारखान्याचा मालक असतो. त्यामुळे सभासदांनाच कारखान्याबद्दल बोलायचा अधिकार आहे. मात्र, जे कारखान्याचे सभासदच नाहीत अशा दीपक पवारांनी केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या हेतूने व हट्टीपणामुळे प्रतापगड कारखान्याची निवडणूक सभासदांवर लादली आहे. सहकाराचा अनुभव नसलेल्यांना कारखान्याच्याच नव्हे, तर तालुक्याच्या राजकारणातून कायमचे हद्दपार करा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीतील जनतेला केले.
खर्शी (ता. जावळी) येथे संस्थापक सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भोसले म्हणाले,‘‘ कारखाना आर्थिक व नैसर्गिक संकटात सापड्ल्याने अडचणीत आला. मात्र, सैारभ शिंदे यांनी हा कारखाना लिलाव प्रक्रीयेपासून वाचवला व सभासदांच्या मालकीचा ठेवला, ही सभासदांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. म्हणूनच सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पँनेलच्या पाठीशी सभासदांनी खंबीरपणे उभे राहावे.
कारखाना सध्या अडचणीत असताना संस्थेवर निवडणूक लादून विरोधकांनी संस्थेवर २५ लाखांचा बोजा वाढवला आहे. ज्यांना तालुक्यात साधी पतसंस्था चालवता आली नाही. स्वताची बँक बुडवली अशा अपप्रवृत्तींच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांच्यापासून सावध रहा. अन्यथा, अशी मंडळी कारखान्यावर साधा पत्राही शिल्लक ठेवणार नाहीत.’’
वसंतराव मानकुमरे म्हणाले, ‘‘सौरभ शिंदे यांनी प्रतापगड कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.’’ सौरभ शिंदे यांचेही भाषण झाले. यावेळी कारखान्याच्या प्रचाराचा प्रारंभ सभासदांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, अँड.शिवाजीराव मर्ढेकर, अंकुशराव शिवणकर, दादा पऱांदे, नाना पवार, प्रदिप शिंदे, बाळासाहेब निकम, विठ्ठल मोरे, प्रदिप तरडे, रामदास पार्टे, आनंदराव जुनघरे, आनंदराव मोहिते, दिलिप वांगडे, विजय शेवते, बाळकृष्ण निकम आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.