-अश्पाक पटेल
Shirval News : शासनाकडे नवीन प्रस्तावित असलेला डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम रद्द करावा व शेतकऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी सध्याच्या रिक्त जागांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांची (पशुवैद्यकीय पदवीधर) नियुक्ती करावी. या मागणीसाठी आजपासुन येथील पशुवैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेले आहेत .
खाजगी संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या १० वी नंतर उपलब्ध असलेला दोन वर्ष कालावधीचा पशुधन व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम शासनाने रद्द केला आहे. त्याऐवजी १२ वी सायन्सनंतर तीन वर्षीय पशुवैद्यकीय पदविका Diploma in Veterinary Medicine (व्हेटनरी सायन्स डिप्लोमा) सुरू करण्याचे विधेयक New Bill विधानसभेत मांडले गेले आहे. या विधेयकाला विद्यार्थ्यांकडून विरोध होत आहे.
शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे बहुसंख्य विद्यार्थी हे सकाळी महाविद्यालयाच्या गेटवर जमले होते. यावेळी त्यांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिरवळ पोलिसांनीही भेट देऊन माहिती घेतली.
पशुवैद्यकीय पदवीधर विद्यार्थी संघटनेने केलेली मागणी अशी आहे, खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेबाबत (MAFSU ) माफसु कायदा (2023 ) च्या दुरुस्तीला आमचा तीव्र विरोध असुन, यासाठी विद्यार्थी संघटनेला विचारात घ्यावे. तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखाने ग्रेड 2 श्रेणी 1 मध्ये श्रेणीसुधारित केले जावे आणि या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा प्रभारी IVC कायदा 1984 नुसार पदवीधर पशुवैद्यकीय (नोंदणीकृत) असावा.
खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करू नयेत. प्रस्तावित अकोला व अहमदनगर शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय आधी सुरू करण्यात यावे.तसेच शेतकऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी सध्याच्या रिक्त जागांवर पशुवैद्यकीय डॉक्टरांची (पशुवैद्यकीय पदवीधर) नियुक्ती करावी. यासाठी संपूर्ण नवीन डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज नाही. असे या विद्यार्थी संघटनेची मागणी आहे .
पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी बेमुदत संपावर गेल्यामुळे महाविद्यालयीन कामकाज आजपासुन ठप्प झाले आहे. तसेच येथे उपाचारासाठी जनावरे घेऊन आलेल्या 100 शेतकऱ्यांना या आंदोलक विद्यार्थ्यांनी माघारी पाठवले आहे. सध्या पावसाळी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विद्यार्थ्यांकडूनच या विधेयकाला विरोध होऊ लागल्याने याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.