Anuradha Jagtap & Dr. Pranoti Jagtap
Anuradha Jagtap & Dr. Pranoti Jagtap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

संक्रांतीनिमित्त जगताप सासू-सुनांची भावी राजकारणाची साखर पेरणी

संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर ) - कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या माजी आमदार राहुल जगताप ( Rahul Jagtap ) यांच्या मातुश्री अनुराधा कुंडलिकराव जगताप व पत्नी डॉ. प्रणोती राहुल जगताप यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या सभासद महिलांची संक्रात गोड झाली आहे. सभासदांच्या घरातील महिलांना या दोघी सासु-सुनांनी दहा हजार साड्यांची घरपोच भेट दिली. Sugarcane sowing of future politics of Jagtap mother-in-law on the occasion of Sankranti

कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक झाली नसली तरी सभासदांना आगळी वेगळी भेट देण्याची संकल्पना अनुराधा जगताप व डॉ. प्रणोती जगताप यांनी राहुल जगताप यांच्याकडे व्यक्त केली. संक्रात आली आहे सभासदांच्या कृपेने निवडणूक बिनविरोध पार पडली त्यामुळे आपण प्रत्येक सभासद कुटुंबाच्या घरी तिळगुळाचा गोडवा पोच करतानाच महिलांना सौभाग्यलेणे देवू अशी संकल्पना मांडली. अनुराधा जगताप यांनी कुंडलिकराव तात्या जगताप यांचा कुकडी उभारणीतील संघर्ष जवळून पाहिला आहे. तात्यांनी कायमच सभासद हिताला प्राधान्य दिले आहे. याच जाणीवेतून तात्यांची आठवण म्हणून जगताप कुटुंबाने सभासदाच्या घरात साड्या पोच करण्याचे ठरविले.

जगताप सासू- सुनांनी यात पुढाकार घेत स्वत: या साड्या घरपोच देत घेत तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सभासद हा कारखान्याचा मालकच आहे याची जाणीव जगताप कुटुंब करुन देत होता. या अनोख्या भेटीलने अनेकांनी तात्यांचे संस्कार राहुल जगताप व जगताप परिवार जपत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

कुकडीची उभारणी हे तात्यांचे स्वप्न होते. आता याच कारखान्यातून सामान्यांची उन्नती ही राहूल दादांची महत्वकाक्षा आहे. याच जाणीवेतून आम्ही दोघींनी सभासदांच्या घरात संक्रातीनिमित्त गोडवा पोच करण्याच्या हेतून दहा हजार साड्यांचे नियोजन केले. ही एका बहिणेची भेट आहे.

- डाॅ. प्रणोती जगताप, संचालक कुकडी कारखाना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT