Suhas Babar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Suhas Babar News : कोयना धरणातून जादा 500 क्युसेक विसर्ग; सुहास बाबरांची मागणी मान्य!

Suhas Babar and Shambhuraj Desai : पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन केली होती मागणी

Anil Kadam

Koyna Dam and Sangali News : आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर कुटुंबीय दुःखातून सावरत कामाला लागले आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईबाबत बाबर यांचे चिरंजीव सुहास यांनी मुंबईत थेट साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. कृष्णा नदी कोरडी पडल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे.

कोयना धरणातून 2 हजार क्सुसेकने पाणी सोडले असले तरी, सध्या ते पाणी पुरेसे नसल्याने जादा 500 क्युसेक पाणी सोडण्याची मागणी केली, मंत्री देसाई यांनी तत्काळ पाचशे क्युसेक जादा पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे तूर्त टंचाईपासून दिलासा मिळणार आहे.

कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या व्यवस्थापनाबाबत दिवंगत आमदार बाबर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यांनी ज्या-ज्या वेळी पाण्याची मागणी केली, कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत होते. त्यांची मागणी आता त्यांचे चिरंजीव सुहास बाबर हे पुढे घेऊन जात असल्याचे दिसून येते. डीपीसीचे सदस्य असणाऱ्या सुहास यांनी साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई भेट घेऊन अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाबर म्हणाले, 'सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनांसाठी कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाणी सोडले जाते. कोयना धरण ते कराडपर्यंत उपसा योजना व कारखाने इत्यादीकडून 500 क्युसेक पाण्याचा वापर होतो. त्यापुढे टेंभू योजनेसाठी 1000 क्युसेक व ताकारी योजनेसाठी 500 क्युसेक असे एकूण 2000 क्युसेक पाणी उपसा केला जात आहे.'

परंतु यामुळे ताकारी योजनेपासून सांगलीपर्यंत कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होऊन तासगाव, पलूस, सांगली, मिरज इत्यादी शहरांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत.'

जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी कोयना धरणातून जादा 500 क्युसेस पाणी सोडण्याची मागणी बाबर यांनी केली. यानंतर तत्काळ मंत्री देसाई यांनी कोयना धरणातून जादा 500 क्यूसेस पाणी सोडण्याचे आदेश दिले. बुधवारी दुपारपासूनच कोयनेतून पाणी सोडण्यात येणार आहे, असे बाबर यांनी सांगितले. यावेळी विटा नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल बाबर, प्रकाश बागल, मिथुन सगरे उपस्थित होते.

पाणीप्रश्नी सातत्याने पाठपुरावा करणार -

चालू वर्षी पर्जन्यमान कमी असल्याने धरणातील पाणीसाठा व पुढे निर्माण होणारी पाणी टंचाई याबाबत आपण सातत्याने लक्ष ठेवून असून याबाबत योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे, असेही सुहास बाबर यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT