Sujay Vikhe On Ram Shinde :
Sujay Vikhe On Ram Shinde :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sujay Vikhe On Ram Shinde : राम शिंदेंच्या खासदार होण्याच्या इच्छेवर सुजय विखेंची प्रतिक्रिया, म्हणाले..

सरकारनामा ब्यूरो

Ahamadnagar NewS : माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांनी दोन दिवसांपूर्वीच खासदार होण्याचा मानस व्यक्त केला होता. यामुळे नगरच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली होती. आता राम शिंदेंच्या या वक्तव्यावर विद्यमान भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला या वक्तव्यासंबंधी काहीही माहिती नाही. मी या दरम्यान दिल्लीत होतो. मात्र खासदार कोण असेल, हे तितके महत्त्वाचे नाही,"असे सुजय विखे पाटील यांनी म्हंटले आहे.

आपल्याला अहमदनगरमधून लोकसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ या दोन्ही वेळेस लोकसभा लढवण्याची संधी चालून आली होती. मात्र, पक्षाअंतर्गच वाद विवादामुळे तेव्हा आपल्याला संधी मिळाली नाही. आता जर पक्षांकडून संधी मिळाली तर लोकसभा निवडणूक लढवणार, अशी इच्छा आमदार शिंदेंनी व्यक्त केली होती. राम शिंदेंच्या या वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली होती.

नेमके काय म्हणाले राम शिंदे?

2014 साली मी नगरमधून लोकसभा लढवावी, असा एक विषय होता. मात्र तेव्हाची राजकारणाची परिस्थिती पाहता, मी विधानसभा लढावली. मात्र २०१९ ला पुन्हा एकदा संधी आली. यावेळी भाजप नेते दिलीप गांधी, तसेच ढाकणे हे सुद्धा इच्छूक होते, तेव्हाही गांधींना भाजपची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, आता आपल्याला संधी मिळाली तर नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवणार, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

सुजय विखेंची प्रतिक्रिया?

मला राम शिंदेंच्या या वक्तव्यासंबंधी काहीही माहिती नाही. मी या दरम्यान दिल्लीत होतो. मात्र खासदार कोण असेल, हे तितके महत्त्वाचे नाही, जितके महत्त्वाचं आहे की, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आमच्यात कुठलीही स्पर्धा नसते, असे सुजय विखे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT