Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सुजय विखे पाटील निघाले दुबईला

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी लोकसभेत केलेल्या भाषणांनंतर त्यांचे भाजपमध्ये अभ्यासू खासदार अशी प्रतिमा तयार होऊ लागली आहे. यातूनच त्यांना आता केंद्र सरकारने पाच दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले आहे. या दौऱ्यासाठी पाच खासदार जाणार आहेत. यात महाराष्ट्रातून जाणारे डॉ. विखे पाटील हे एकमेव खासदार आहेत. ( Sujay Vikhe Patil leaves for Dubai )

या दौऱ्या संदर्भात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील 5 खासदार आणि अधिकाऱ्यांचं डेलिगेशन यु.एस.ई. येथे अभ्यास दौऱ्यासाठी दिल्ली येथून रवाना होत आहे.

2 दिवस अबुधाबी आणि 2 दिवस दुबई असा हा दौरा आहे. यामध्ये दुबई आणि अबुधाबी येथील राजे, राजकीय अधिकारी यांची भेट, दुबई एक्स्पोला भेट आदी गोष्टींचा समावेश असेल. दोन्ही देशांच्या प्रगती संदर्भात चर्चा आणि नियोजन हे या अभ्यास दौऱ्याचे उदिष्ट आहे.

या अभ्यास दौऱ्यामध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील. खासदार सुशील कुमार मोदी, खासदार डॉ. एम. के. विष्णु प्रसाद, खासदार पी. रवींद्रनाथ, खासदार शंकर ललवानी, लोकसभेचे सचिव उत्पल कुमार, लोकसभा सेक्रेटेरियटचे संयुक्त सचिव डॉ. अजय कुमार, डायरेक्टर लालकिथांग, राजीव दत्ता, हिमांशू शेखर झा, मोहम्मद सलीम यांचा समावेश आहे.

दौऱ्याला निघण्यापूर्वी डॉ. विखे पाटील यांनी दौऱ्यातील सहभागी सर्वांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर टाकला. तसेच दौऱ्याची थोडक्यात माहिती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT