Kolhapur Political News : राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर चर्चेत आला तो कागल विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना भाजपसोबत सत्तेत घेतल्यानंतर भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे नाराज झाले होते. त्यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी घाटगेंना चिमटे काढले, तर घाटगेंच्या माध्यमातून मुश्रीफांवरही सुळेंनी घणाघात केला. हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना आता 'वॉशिंग मशीन'मध्ये घालून पालकमंत्री केले का? असा सवाल सुळेंनी भाजपला केला आहे. (Latest Political News)
'नॅशनल करप्ट पार्टी' म्हणून भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) अवहेलना करण्यात येत होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत राज्यात भ्रष्टाचाराचे पेव फुटले असून, यात राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचा आरोप केला होता. तसेच शिखर बँक आणि सिंचनात तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही मोदींनी केला होता. त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ जण सत्तेत सहभागी झाले. भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करूनही भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्याने विरोधकांनी टीकेची राळ उठवली. यात खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचेही दिसून येते.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
'माझी समरजितसिंह घाटगेंना विनंती की, तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले तेच आता तुमचे पालकमंत्री आहेत. तुमचे आणि भाजपचे आरोप खरे असतील, तर मुश्रीफांना वॉशिंग मशीनमध्ये घालून पालकमंत्री केले हे कबूल करा. तसे नसेल तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगून जाहीर करून महाराष्ट्र जनतेची माफी मागावी. समरजितसिंह घाटगे यांनी पारदर्शकपणे खरे बोलावे, असे आवाहन सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) घाटगेंना केले आहे.
घाटगेंना डिवचले
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या पक्षीय मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी कागलचे भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना लक्ष्य केले. हसन मुश्रीफ हे भाजपसोबत आल्याने समरजित घाटगे काय करणार? मुश्रीफांमुळे अनेकांची अडचण झाली आहे, असे सुळेंनी घाटगेंना जाहीरपणे डिवचले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.