Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushilkumar Shinde: सुशीलकुमार शिंदेंची 'चाय पे चर्चा';चंद्रकांतदादा शिंदेंची घेणार भेट

Maharashtra Politics: उगाच खाजवून खरूज काढण्याचा माझा स्वभाव नाही...

सरकारनामा ब्यूरो

विश्वभूषण लिमये

Solapur: राज्यभर थंडीचा पारा घसरत असताना सोलापूर मधील राजकीय वातावरण तापत आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळी सोलापुरकरांशी 'चाय पे चर्चा'केली.

सोलापूर मधील जांभळे कँटीनमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी चहाचा आस्वाद घेतला. मॉर्निंग वॉकनंतर शिंदेंनी विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उद्योगपती यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारी रोजी सोलापूर दौरा आहे. या दैौऱ्याला शिंदे जाणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर शिंदे म्हणाले

"मोदींचे स्वागत करण्यासाठी जाण्याचा प्रश्चच येत नाही. कारण मोदींचा कार्यक्रम हा विशिष्ट कार्यकर्त्याचा कार्यक्रम आहे. उगाच खाजवून खरूज काढण्याचा माझा स्वभाव नाही त्यामुळे मी ते टाळतो,"

सोलापुरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज सुशीलकुमार शिंदेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी येत आहेत. त्यावर शिंदे म्हणाले,"चंद्रकांत पाटलांनी हा दौरा गुपित ठेवला असला तरी ते नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी येत असल्याचे मला माहिती आहे. ते माझ्या घरी येत आहे ही चांगली गोष्ट आहे,"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर शहरात 19 जानेवारी रोजी मोदींचा रोड शो होणार आहे. रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी मोदी येत आहेत. त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगोला आणि मंगळवेढा येथे कार्यक्रम घेतल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. शरद पवार यांच्या सोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांचे जुने सहकारी आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील आमदारही हजेरी लावणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे सोलापुरात त्या दिवशी राजकीय फटकेबाजी पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT