सोलापूर : आगामी काळात निवडणूक (Election) लढणार नाही, अशी घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केली. ही घोषणा करताना मात्र मी अजून म्हातारा झालो नाही. उर्वरीत काळ हा सर्वसामान्यांसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी काम करत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Sushilkumar Shinde's announcement of not contesting elections)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त सोलापुरातील काँग्रेस भवनात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. त्या वेळी त्यांनी निवडणूक न लढविण्याबाबत पुनरुच्चार केला.
ज्येष्ठ नेते शिंदे म्हणाले की, प्रत्येक वार्डात पदाधिकारी नेमून काँग्रेस पक्ष घराघरांत पोहोचवा. पक्ष बळकट करून सोलापूर महापालिकेवर तिरंगा फडकवा. महागाई, बेरोजगारी, जातिभेदाविरूद्धच्या ‘भारत जोडो’त मी पण कित्येक किलोमीटर चाललो. ‘मी जरी ऐंशी-ब्याऐंशी वर्षांचा झालो असलो, तरी मी अजून म्हातारा झालो नाही, अजून जवानच आहे’. उरलेला काळ सर्वसामान्यांसाठी आणि काँग्रेससाठी काम करत राहील. काँग्रेससाठी येणारा काळ कठीण असून कार्यकर्त्यांनी संघर्षासाठी तयार राहावे
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते आदी उपस्थित होते. याप्रसंगी ‘सेवादल’च्या नुतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच ‘भारत जोडो’मध्ये सलग अडीच महीने चालल्याबद्दल इरफान शेख यांचा सत्कार करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.