mla prakash awade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Protests : आमदार आवाडेंना खाऊ घातला झणझणीत खर्डा, आक्रमक कार्यकर्त्यांनी दिला दिवाळी फराळ!

Swabhimani Shetkari Sanghatana Protest Against Mla Prakash Awade : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऐन हंगामात आणि दिवाळीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा फटका कारखानदारांना बसला आहे...

Rahul Gadkar

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटना मागील हंगामातील 400 रुपये दरावरून आक्रमक झाली आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टर पेटवल्याच्या घटना घडलेल्या असून, स्वाभिमानी कार्यकर्त्यांकडून ऊसतोड बंद पाडली जात आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे हात रिकामे असताना कारखानदारांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना दारात जाऊन कांदा, खर्डा, भाकरीचा आहेर दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आज इचलकरंजीतील आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी जाऊन त्यांना दिवाळीचा फराळ म्हणून भाकरी खर्डा दिला. या वेळी आमदार आवाडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फैलावर घेतले. आमदार आवाडे यांनीदेखील शेतकऱ्यांनी आणलेला खर्डा भाकरी खाऊन त्यांची भूमिका समजून घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजू शेट्टींनी वसुबारसनिमित्त ठिय्या आंदोलनस्थळी केली गोपूजा

भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही. हेच लक्षात ठेवून राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी गोमातेची पूजा केली.

तीन दिवसांनंतरही ठिय्या

७ नोव्हेंबर रोजी २२ वी ऊस परिषद झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर गेल्या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाला ४०० रुपये द्या, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांची दिवाळी आधी ४०० रुपये दुसरा हप्ता दिला असता, तर दिवाळी गोड झाली असती. गेल्या तीन दिवसांपासून जयसिंगपूर येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही हे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT