Swabhimani Sanghatna Andolan, satara sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : उरमोडीचे पाणी पेटले : स्वाभिमानीचे कार्यकर्ते तापले

Swabhimani Shetkari Sanghatna स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उरमोडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धडक मारली

Umesh Bambare-Patil

तत्काळ निलंबनाची मागणी

Satara News : उरमोडी धरणातील पाणी राजकीय दबावाखाली आणि अर्थपूर्ण तडजोडी करून कण्हेर भुयारी मार्गाने पळवापळवी केली आहे. मुळात खरे लाभार्थी वंचित राहून अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसून करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे. याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे तत्काळ निलंबन करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे उरमोडी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे Swabhimani Shetkari Sanghatna जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल उरमोडी पाटबंधारे विभागाच्या Urmodi Dam कार्यालयात धडक मारली. या वेळी अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मारला.

या वेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मनोहर येवले, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, संजय जाधव, राजू घाडगे, उमेश घाडगे, जनार्दन आवारे, महादेव डोंगरे, संतोष घाडगे, शशिकांत घोरपडे, रावसाहेब घोरपडे, सुधाकर शितोळे, विश्‍वासराव घोरपडे, जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू केंजळे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले, की जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती असूनही सर्व स्तरांवरील पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ही दरवाढ रद्द करावी. उरमोडी धरणातील पाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कण्हेर भुयारी मार्गाने राजकीय दबावाखाली आणि अर्थपूर्ण तडजोडी करून पळवापळवी केली आहे.

त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत. याची सखोल चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तत्काळ निलंबन करावे. सातारा तालुक्यातील नदी तसेच कॅनॉलची यावर्षीची आवर्तने यांची यादी पाण्याचे पुढील हंगामनिहाय नियोजन तसेच प्रत्येक धरणातील लवादातील वाटप याची तत्काळ लेखी माहिती द्यावी.

शेतकऱ्यांची पाणीपट्टी दोन वेळा साखर कारखान्याच्या तसेच इतर मार्गाने वसूल केली गेली आहे. ही बाब आपल्या विभागाच्या लक्षात आणून देऊनसुद्धा वसुली केलेली आगाऊ रक्कम आजपर्यंत त्या शेतकऱ्यांना परत दिली गेली नाही. ती रक्कम तातडीने नियमानुसार १५ टक्के विलंब व्याजासह शेतकऱ्यांना परत करावी. याबाबत निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार आहे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT