Balasaheb Patil, Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad APMC Election : टीका करण्यापेक्षा बाजार समितीवर बोला : बाळासाहेब पाटलांचे चव्हाणांना आव्हान

Balasaheb Patil पाल येथील शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारप्रसंगी बाळासाहेब पाटील बोलत होते.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad Bazar Samiti News : संस्था चांगली चालावी ही भूमिका घेऊन व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कराड बाजार समिती निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहोत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बाजार समितीच्या माध्यमातून केले जाते. मात्र, अनेक शासकीय योजनांचा लाभ न घेतल्याने बाजार समितीत अमूलाग्रह बदल होवू शकला नाही. विरोधकांनी टीका टिपणी करण्यापेक्षा बाजार समितीवर बोलावे, असे थेट आव्हान माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी दिले.

पाल येथील शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचार प्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, कृष्णा  बँकेचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, कऱ्हाडउत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बाजार समितीच्या माध्यमातून केले जाते मात्र विरोधकांनी कराड उत्तर मधील भाजपच्या काही मंडळीना बरोबर घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. अनेक शासकीय योजनांचा लाभ न घेतल्याने बाजार समिती मध्ये अमूलाग्रह बदल होवू शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Latest Marathwada News)

अतुल भोसले म्हणाले, बाजार समितीचा उपयोग हा राजकारणाचा अड्डा म्हणून केला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सोसायटी निर्माण केल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच माजी मुख्यमंत्री म्हणतात मी सहकारातील निवडणुकीत भाग घेत नाही. सहकारात काही केलच नाही तर भाग घेतील कसे ? एका बाजूला मोदींवर टीका करायची व दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते घेऊन फिरायचे. तसेच टोळी तुमच्याकडे असून, तुम्हीच टोळी तुम्ही घेऊन फिरत असल्याची टीका त्यांनी केली. (Latest Maharashtra News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT