Shivsena Udhav Thackeray Group sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Shivsena News : उद्धव ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावली...

Tasgaon तासगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करत असून ही लोकं सामान्य लोकांना लुबाडत असल्याचे तालुका प्रमुखाचे म्हणणे आहे.

Umesh Bambare-Patil

Sangali Shivsena News : बोगस लोकांच्या हातात शासकीय कागदपत्रे दिल्याने सांगली जिल्ह्यातील तासगांव येथे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखाने भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे.

तासगाव (जि. सांगली) येथील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोकं सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात, अशी माहिती मिळाली हाोती. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेले शिवसेनेच्या Shivsena उद्धव ठाकरे Udhav Thackeray गटाच्या तालुका प्रमुखाने भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे यांच्या कानशिलात लगावली.

सरकारी कागदपत्रे बोगस लोकांच्या हातात दिल्याने बाळू लोखंडे या बोगस व्यक्तीलाही माने यांनी थोबाडीत लगावली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. तासगाव पोलीस ठाण्यात याबाबतची कोणतीही नोंद झाली नव्हती.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT