Maharashtra Karnatak Dispute  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Karnataka Dispute : बेळगावमध्ये तणाव; ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना बेळगावमध्ये जाण्यापासून रोखलं

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Karnataka Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं. तर आज बेळगावजवळ कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. त्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले.

पुण्याच्या (Pune) स्वारगेट बस स्थानकातील कर्नाटकच्या बसेसला काळे फासण्यात आले. तर तिकडे बेळगावमध्ये (Belgaum) ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना बेळगावच्या सीमेवर जाण्यापासून रोखण्यात आलं. कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख, विजय देवणे यांच्यासह ठाकरे गट शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून बेळगावमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर यातच ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, महाराष्ट्राच्या (Maharashtra) ट्रकवर हिरेबागेवाडी- बेळगाव टोलनाक्याजवळ आज कन्नड संघटनांकडून हल्ला करण्यात आला. या घटनेने सीमावाद आणखीच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, ''मुख्यमंत्र्यांनी दडपशाही सुरू केली आहे. त्यामुळे याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लक्ष द्यावे, महाराष्ट्र-कर्नाटक या देन्ही राज्याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अन्यथा हा वाद आणखी चिघळू शकतो, असं सांगत आम्ही बेळगावच्या सीमोवर गनिमी काव्याने जाणार आहेत'', असा इशारा ठाकरे गट शिवसेनेचे विजय देवणे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT