Satyajit Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : राहुल की मिलिंद? ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील गडबडले

Rahul Gadkar

Lok Sabha Election Politics Kolhapur News :

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कोल्हापुरात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पार पडलेल्या मेळाव्यात पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित (आबा) पाटील -सरूडकर यांनी या मेळाव्यात प्रमुख नेत्यांना सुनावले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक Mahavikas Aghadi मिळून सामोरे जाणार आहे. अशा परिस्थितीत शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची मदत मिळत नाही. केवळ कोल्हापुरातच मिळावे घेऊ नका. वरिष्ठांच्या परवानगीने विधानसभा मतदारसंघातही मेळावे घ्या. आपले हेवेदावे बाजूला ठेवून लक्ष एक ठेवा. गद्दारांनी केलेल्या अपमानाचा बदला घ्या, अशा शब्दांत प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना माजी आमदार सत्यजित (आबा) पाटील- सरूडकर यांनी सुनावले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रता प्रकरणाच्या निकालावर बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील गलबडून गेले. शिवसेनेच्या अपात्र आमदारावर निकाल देताना राहुल नार्वेकर यांचे नाव घेण्याऐवजी त्यांनी मिलिंद नार्वेकर यांचे नाव घेतले. त्यावेळी त्यांची झालेली चूक संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर आणि शिवसेना ठाकरे गट उपनेते संजय पवार यांनी निदर्शनास आणून देत 'राहुल' नाव घ्या असे सुचवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्या आणखी आमदार, खासदार गद्दारांसोबत जातील. जे जाणारे आहेत ते जाऊ देत. आमचा पक्ष हा उद्धव ठाकरे आहेत, हे लक्षात ठेवा. जनता आणि शिवसैनिक आमचा पक्ष आहे. दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद जास्त आहे. आमचा उमेदवार कोण असणार माहिती नाही. जो असेल त्याने शिस्त पळाली पाहिजे. ठाकरे यांनी आदेश दिला तोच पळाला जाईल. तोच या मतदारसंघाचा खासदार असेल, असा विश्वास सत्यजित पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT