BJP workers cheered
BJP workers cheered Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कर्डिलेंचा तो ठराव आला राम शिंदेंच्या कामी : भाजप कार्यकर्त्यांत जल्लोष

अमित आवारी

अहमदनगर - भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी आज विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी मिळण्यात भाजपचे नेते माजी आमदार शिवाजीराव कर्डिले ( Shivajirao Kardile ) यांचा अप्रत्यक्ष हात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे. ( That resolution of Kardile came in the work of Ram Shinde: BJP workers cheered )

विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार व भाजपचे राम शिंदे यांच्यात लढत झाली. यात रोहित पवार यांचा विजय झाला. राम शिंदे हे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. या पराभवामुळे जिल्ह्यात भाजपमधील जुन्या निष्ठावंतांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रोहित पवार यांचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवावे अशी मागणी जोर धरत होती.

राम शिंदे यांची भाजप कोअर कमिटीत निवड झाल्याबद्दल काही महिन्यांपूर्वी अहमदनगर शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयात भाजप कार्यकऱ्यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होते. या सभेत भाषण करताना शिवाजीराव कर्डिले यांनी राम शिंदे यांना विधान परिषदेवर आमदार करावे, असा ठराव मांडला. या ठरावाला भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने मंजूर करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे पाठविण्यात आला होता. तेव्हापासून राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती.

दरम्यान राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपकडून राम शिंदेचेही नाव चर्चेत आले होते. मात्र अखेर त्यांचे नाव मागे पडले. राम शिंदे यांनी स्वतःही विधान परिषदेसाठी उमेदवारीची तयारी पत्रकार परिषदेत बोलून दाखविली होती. अखेर पक्ष श्रेष्ठींनी काल ( मंगळवारी ) रात्री त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे कर्जत व जामखेड शहर तसेच चौंडी गावात भाजप कार्यकऱ्यांनी आतषबाजी करत आनंदोत्सव केला आणि कर्डिलेंचा तो ठराव शिंदेच्या कामी आला.

राम शिंदे यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल केला. त्यामुळे या उमेदवारीतून देवेंद्र फडणवीस यांनी आता अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकऱ्यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT