Sangram Jagtap & Vinayak Mete Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

तो स्पॉट जीवघेणा : मेटेंनी जीव गमावला; संग्राम जगतापांच्या गाडीचा चक्काचूर

त्याच जागेवर आज शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे ( Vinayak Mete ) यांचे दुर्दैवाने अपघाती निधन झाले.

अमित आवारी

अहमदनगर - मुंबई-पुणे दुर्तगती महामार्ग हा धोकादायक झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी याच महामार्गावरील रासायनी परिसरात पहाटे एका आमदाराचा अपघात झाला होता. तीन महिन्यांनंतर पुन्हा त्याच जागेवर आज शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे ( Vinayak Mete ) यांचे दुर्दैवाने अपघाती निधन झाले. त्यामुळे या अपघातांची चर्चा सुरू झाली आहे.

तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 17 मे 2022 अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्या वाहनाला पहाटे अपघात झाला. त्यावेळी आमदार जगताप यांच्यासह पाच जण या वाहनात होते. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला. मात्र वाहनातील सर्व एअर बॅग ओपन झाल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नव्हती.

रासायनी परिसरातील त्याच जागेवर आज विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात मात्र मेटे यांचे निधन झाले. मेटे यांच्या वाहनातील एअर बॅग का उघडल्या नसाव्यात, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

आमदार जगताप यांच्या वाहनाचा अपघात होताच त्यांना त्वरित मदत मिळाली होती. त्यामुळे ते सकाळ होईपर्यंत मुंबईत दाखल झाले होते. विनायक मेटे यांचीही मुंबईत आज सकाळी मराठा संघटनेची बैठक होती. मात्र ते या बैठकीला पोहचू शकले नाहीत. मेटे यांना अपघात झाल्यावर एक तास मदत मिळाली नसल्याचा आरोपही शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. हे दोन्ही नेते मराठा समाजातील आहेत.

माझा अपघात ज्या ठिकाणी झाला. त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे. या अपघातात मराठा समाजाचे मोठे नेते विनायक मेटे यांचे निधन झाले. या अपघातामुळे मराठा समाजाची न भरून येणारी हानी झाली आहे. याच ठिकाणी का अपघात होतात. याची चौकशी व्हायला हवी.

- आमदार संग्राम जगताप.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT