kolhapur Crime|
kolhapur Crime|  
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur news : आमदाराला फसवण्याची डेअरिंग, तुरुंगातून सुटताच लगेच केला स्टंट

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : शंभर कोटी रुपये द्या तुम्हाला मंत्रीपद देतो असं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिरोली येथील रियाज शेख याची जामीनावर सुटका होताच त्याने स्टंट केला आहे. तो शिरोलीत येताच फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करत त्याच स्वागत करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा स्टंट कोल्हापूरमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (Kolhapur Crime news)

माजी आमदार राहुल कुल यांनी आमदारांना मंत्रीपदाच आमिष दाखवून 100 कोटी रुपये मागणाऱ्या चौघांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर मुबंई क्राईम ब्रँचने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील रियाज शेख याच्यासह चौघांना अटक केली होती. यानंतर रियाज शेख याचा जामीन झाला आणि तो शिरोलीत आला. यावेळी त्याचे फटाके फोडून आणि फुल उधळून स्वागत केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत I AM BACK, KINGS KING अशी वाक्य लिहीली आहेत. एखाद्या संशयित आरोपीने अशाप्रकारे स्टंट केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यात शिंदे सरकार (Maharashtra Politics) स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. याचाच फायदा घेत राज्यातील काही आमदारांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी गेल्या महिन्यात कोल्हापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली.

रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी(वय ५३, नागपाडा, मुंबई) या आरोपांना अटक करण्यात आली होता. दौंडचे आमदार राहुल कुल आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी हा डाव उधळून लावला होता.

''पहिल्यांदा फोन आल्यानंतरच ही व्यक्त बनावट असल्याचे आमच्या लक्षात आले होते. त्यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत कल्पना दिली. गुन्हे शाखेला सुचना दिल्यानंतर आम्ही संबंधित व्यक्तीला बोलावले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केल्याचे'' राहुल कुल यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT