Siddheshwar Sugar Factory chimney : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या को-जनरेशनची ९२ मीटर उंचीची बहुचर्चित चिमणी अखेर गुरुवारी दुपारी सव्वा चार सुमारास कोसळली. सोलापूरच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात गेली काही वर्षांपासून चर्चेची ठरलेली चिमणी जमीनदोस्त झाली. आता विमानसेवा सुरू करण्याची नैतिक जबाबदारी चिमणी विरोधी गटावर असणार आहे. (The 92 meter high chimney of Siddheshwar Sugar Factory has finally collapsed)
सोलापूरच्या (Solapur) विमानसेवेला अडथळा ठरण्याचा आरोप असलेली सिद्धेश्वर साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) चिमणी पाडण्याच्या कामासाठी बुधवारी पहाटेपासून कारखाना परिसर सील करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष चिमणी पाडकामास गुरुवारी पहाटेपासून सुरुवात झाली. त्यानंतर गुरुवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास चिमणी पाडली गेली. तत्पूर्वी पोलिसांनी कारखान्याचा परिसर ताब्यात घेतला होता. परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. तब्बल २१०० पोलिस कर्मचारी, सहा जेसीबी, दोन क्रेन आणि एका पोकलेनच्या माध्यमातून तब्बल ९२ मीटर उंचीची चिमणी पाडण्यात आली.
चिमणी वाचविण्यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्यासह सभासद शेतकऱ्यांनी धावपळ केली, आंदोलने उभारली. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. कारखाना कामगारांच्या घराबाहेर चक्क बंदुकधारी पोलिस तैनात करण्यात आले होते. काडादी यांनी तर मुंबईत मंत्रालय गाठून चिमणी पाडकाम थांबविण्यासाठी मोठे प्रयत्न केले. तसेच, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातूनही स्टे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही आणि कारखान्याचा वैभवशाली इतिहास सांगणारी चिमणी अखेर गुरुवारी सव्वाचारच्या सुमारास जमीनदोस्त झाली.
चिमणी पाडकामाला सुरुवात करण्यासाठी साहित्याची जुळवाजुळवा करताच समर्थकांनी गर्दी केली हेाती. मात्र, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून मागची चूक सुधारली. त्यामुळे तब्बल ५० हून अधिक अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी आपली मोहिम फत्ते केली. आता चिमणी पाडल्यामुळे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा पुढील हंगाम सुरू होईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.