Ahmednagar Municipal Corporation
Ahmednagar Municipal Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाने प्रशासनासमोर वाढविला पेच

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर महापालिका ( Ahmednagar Municipal Corporation ) कामगार संघटनेने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी पदाधिकाऱ्यांनी चार दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. आज सर्व कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनात सहभाग नोंदविल्याने महापालिकेतील कामकाज काही काळ ठप्प होते. कामगार संघटना व महापालिका आयुक्तांच्या बैठका होत असल्या तरी कोणताही तोडगा निघत नसल्याने प्रशासनासमोर हे आंदोलन मोठा पेच ठरत आहे. ( The agitation of the employees of the Municipal Corporation increased the tension in front of the administration )

महापालिका कामगारांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठीचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविला जावा. महापालिकेतील 305 व 506 कोर्ट कर्मचाऱ्यांतील सफाई कामगारांचे वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पंतप्रधानांच्या गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवी आदी 12 मागण्यांसाठी महापालिका कामगार संघटनेचे धरणे आंदोलन तीन दिवसांपासून सुरू होते. आज आंदोलनाचा चौथा दिवस होता. मागील तीन दिवसांत प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संघटनेने अखेर आज कामबंदचे हत्यार उपसले.

आज अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन महासभेचे आयोजन केले होते. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे यांना आमच्या प्रलंबित विविध मागण्या मान्य करा तेव्हाच आम्ही काम सुरु करू, असा इशाराच अहमदनगर महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला.

कर्मचाऱ्यांच्या आज झालेल्या सभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा महापालिका कर्मचारी संघटनेने निषेध केला. कामगार एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, बाबासाहेब मुदगल, संघटनेचे उपाध्यक्ष आनंद वायकर, शेख पाशा इमाम, सूर्यभान देवघडे, नंदू नेमाने, राहुल साबळे, आयुब शेख, बलराज गायकवाड आदी उपस्थित होते.

लोखंडेंनी गायिले महाराष्ट्र गीत

अहमदनगर महापालिकेत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू असताना अहमदनगर महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी त्यांच्या पहाडी स्वरात महाराष्ट्र गीत सादर केले. त्यांच्या आवाजाने भारावलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांनीही साथ दिली.

अहमदनगर महापालिका कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. महापालिका आयुक्तांबरोबर बैठकाही होत आहेत. या बैठकांतून आमच्या 12 मागण्यांपैकी स्थानिक मागण्या सुटण्याच्या बेतात आहेत. मात्र सातव्या वेतन आयोगासह तीन मागण्यावर अजूनही समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळालेले नाही. हे तीनही प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. हे प्रश्न महापालिका आयुक्त व उपायुक्तांनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करत सोडवावेत अशी आमची मागणी आहे. त्यावर महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी मंत्रालयात जाण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. महापालिका आयुक्तांच्या या प्रस्तावावर विचार करून आम्ही निर्णय घेऊ.

- अनंत लोखंडे, अध्यक्ष, अहमदनगर महापालिका कामगार संघटना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT