Ahmednagar News : अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शनिवार) कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या हल्ल्याच्या घटनेमुळे नगर शहरात एकच खळबळ उडाली. या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे.
नगर शहरातील कापडबाजार, तेलीखुंट तसेच कापड बाजार परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी आज बंद ठेवली आहेत. यावेळी व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.
नगर शहरातील कापड बाजारामध्ये शुक्रवारी सायंकाळी गाडी लावण्यावरून दीपक नवलानी या व्यापाऱ्याशी काही जणांनी हुज्जत घालत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये नवलानी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. सध्या अहमदनगर शहरातील कापड बाजार परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.