Phaltan Market Committee : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी १२१ अर्ज दाखल झाल्याने राजेगटाअंतर्गत बंडाळी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बंडाळी रोखण्याचे आव्हान राजेगटाच्या नेतृत्वासमोर आहे. खासदार गट निवडणूक लढवणार नसल्याचे सध्यातरी दिसत आहे. तर काँग्रेस Congress, शिवसेना Shivsena, उद्धव ठाकरेंची Udhav Thackeray शिवसेना आणि रासपने RSP या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालच्या शेवटच्या दिवशी एकुण १२१ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या बुधवारी अर्जांची छाननी होणार आहे. २० एपिल पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. इतक्या माोठ्या प्रमाणात आलेले उमेदवारी अर्ज राजेगटाची डोकेदुखी ठरली आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या निवडणुकीत सावध भूमिका घेतली आहे. आपल्या गटाकडून एकही उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेले नाहीत. बाजार समितीतील मताधिक्य विचारात घेतल्यास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेली भूमिका योग्यच मानली जात आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ही चाल त्यांना पूरक ठरणार आहे. एकीकडे भरमसाठ अर्ज दाखल करुन वेळप्रसंगी बंडखोरी करण्याची तयारी राजेगटातील कार्यकर्त्यांनी ठेवली आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार फलटण तालुक्यात कोणतीही निवडणूक लढवली जात नसल्याचे सांगत काँग्रेस पक्षाने आपले अर्ज दाखल केले आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना फलटण तालुक्यात आपले नशीब आजमावत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करुन पूर्ण करुन घेताना दिसत होती. आता या कामांची पोहोचपावती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे धनगर समाजाचे मताधिक्य ओढून घेण्याच्या विचारात राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणूकीत उडी घेतली आहे. पण, रासप कितपत तग धरणार यावर सर्व अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.