Prithviraj Chavan With His Family sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : महाराष्ट्रावरील संकटाचे काळे ढग दूर होऊ देत : पृथ्वीराज चव्हाणांचे गणरायाला साकडे

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Prithviraj Chavan News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. या वेळी चव्हाण यांनी कुटुंबीयांसमवेत गणरायाचे पूजन करीत महाराष्ट्रावर आलेले संकटाचे काळे ढग दूर होऊ देत, अशी प्रार्थना त्यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले, आज गणेश चतुर्थीच्या दिवशी येथील घरी कुटुंबीयांसमवेत गणपतीची स्थापना केली. महाराष्ट्रात Maharashtra तसेच देशात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव हा धार्मिक कार्यक्रम असला तरी त्याहून हा कार्यक्रम सांस्कृतिक व सामाजिक झालेला आहे.

हा उत्सव म्हणजे ऐक्याचे व बंधुत्वाचे प्रतीक आहे. यानिमित्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी लाभावी, संकटाचे काळे ढग जे दिसताहेत ते दूर होऊ देत. दुष्काळाची परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी दिसत आहे, ती दूर होऊ देत, अशी प्रार्थना गणरायाकडे करतो.

लोकांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जितक्या लवकर पाऊस पडेल तेवढा पिण्याच्या व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देतो.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT