Pruthviraj & Vaishnawi Nagawade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सुना संपविणार नागवडे कुटुंबाचा राजकीय सासुरवास..

काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) व अनुराधा नागवडे ( Anuradha Nagawade ) यांचे सुपुत्र पृथ्वीराज यांचा विवाह सांगली येथील बडे प्रस्थ मनोज म्हैसाळकर यांची मुलगी वैष्णवी हिच्याशी होत आहे.

संजय आ. काटे

Nagawade family : श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade )अनुराधा नागवडे ( Anuradha Nagawade ) यांचे सुपुत्र पृथ्वीराज यांचा विवाह सांगली येथील बडे प्रस्थ मनोज म्हैसाळकर यांची मुलगी वैष्णवी हिच्याशी होत आहे. ही सोयरीक नागवडे कुटूंबासाठी नवी उमेद घेवून येणारी ठरणार असल्याचे संकेत आज मिळाले.

सांगलीत झालेल्या साखरपुड्याच्या समारंभात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजीमंत्री जयंत पाटील यांनी श्रीगोंदेकरांशी साधलेली. आपुलकीची विचारपुस लक्षवेधी ठरली. नवरीमुलगी ही पाटील यांची जवळची नातेवाईक असून त्यांच्याच पुढाकारातून हा विवाह होणार असल्याने आमदारकीची तयारी करणाऱ्या नागवडे कुटूंबासाठी होणारी सुनबाई 'लकी' ठरणार असल्याचे दिसते.

सांगली येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असणाऱ्या मनोज बाबा शिंदे ( म्हैसाळकर) हे सांगली परिसरातील बडे प्रस्थ समजले जाते. माजीमंत्री जयंत पाटील यांच्या पत्नीचे ते बंधू आहेत. आगामी आमदारकीची तयारी करणाऱ्या नागवडे कुटूंबासाठी ही सोयरीक निश्चितच महत्वाची ठरणार असल्याचे आज लक्षात आले. पृथ्वीराज व वैष्णवी यांच्या साखरपुडा समारंभात जयंत पाटील श्रीगोंद्यातून आलेल्या प्रत्येकाशी संवाद साधून आपुलकीने चौकशी करताना दिसले. त्यांची तेथील पुर्णवेळ हजेरी बरेच काही सांगून गेली.

विधानसभेला श्रीगोंद्याची जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. नागवडे हे काँग्रेस सोबत असल्याने त्यांना आमदारकीला वेगवेगळ्या कारणांनी थांबावे लागले अथवा तेच थांबले. यावेळी मात्र आमदारकी लढणारच या तयारीत असणाऱ्या अनुराधा नागवडे यांना संधी असल्याचे बोलले जाते. त्यातच आता त्यांच्या पंजाच्या हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ आले तर ही लढाई अजूनच धारदार होईल असे दिसू लागले आहे.

राष्ट्रवादीला येथे पर्याय असले तरी अनुराधा नागवडे यांच्या रुपाने कोरी पाटी मिळाली तर पक्ष नेतृत्व त्यादृष्टीने विचार करु शकते आणि त्यावेळी जयंत पाटील यांची भुमिका महत्वाची ठरेल. त्यामुळे ही सोयरीक न येणारी नवी नवरी नागवडे कुटूंबासाठी लकी ठरु शकते अशी चर्चा आहे. अर्थात अनुराधा नागवडे याही उमरगा येथील चालुक्य या बड्या राजकीय वारसा असणाऱ्या कुटूंबातील असल्याने त्यांची राजकीय परिपक्वता यापुर्वीच दिसून आली आहे. त्यामुळे नागवडे कुटूंबातील सुना 'बापुं'नंतर राजकीय सासुरवास संपविणार असेच दिसू लागले आहे.

शालिनी विखे पाटलांची हजेरी

हा समारंभ घरगुती असला तरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व भाजप नेत्या शालिनी विखे पाटील यांची हजेरीही लक्षवेधी ठरली. त्यांचे व अनुराधा नागवडे यांची जवळीक त्यात अधोरेखित झाली. आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांच्याशी जयंत पाटील यांनी बारकाईने केलेली विचारपुसही चर्चेत होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT