Prachi Tathe
Prachi Tathe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

वडिलांचा अंत्यविधी करून आलेल्या मुलीने दिला दहावीचा पेपर

दौलत झावरे

अहमदनगर - मुलींना आपला पिता आधारस्तंभ वाटत असतो. कुटुंबाचा तो आर्थिक कणा असतो. अहमदनगर शहरा लगतच्या भिंगारमधील एका कुटुंबावर काळाने काल रात्री घाला घातला. सारे कुटुंब दुःखात होते. पहाटे घरातील कर्त्या पुरुषाचा अंत्यसंस्कार करण्यात आला. दुःखात असलेल्या मुलीने काळजावर दगड ठेवत सअश्रू नयनांनी दहावीचा भूगोलाचा पेपर आज लिहिला. ( The daughter who came after the funeral of her father gave the paper of 10th )

भिंगारमधील ताठे यांच्या घरावर काळाने घाला कर्ता पुरूषच नेला. सर्व कुटुंब दुखाच्या डोंगर कोसळला होता. या दुखातून सावरत प्राची ताठे हिने आज (ता. 4) दहावीचा भूगोलचा पेपर दिला. तिच्या धैर्याला भिंगारकरांनी सलाम केला आहे.

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हास्यकूलमध्ये प्राची संदीप ताठे (रा. भिंगार, ताठे मळा) ही शिक्षण घेत आहेत. प्राचीचे वडील संदीप ताठे यांचे रात्री दोन वाजून 30 मिनिटांनी निधन झाले. ताठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संदीप ताठे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्व कुटुंबिय घरी आले. या घटनेची माहिती शाळेतील शिक्षकांना समजली. त्यानंतर प्राचार्य राजेंद्र बेद्रे यांनी वर्ग शिक्षक ए. ए. पाठक, क्रीडा शिक्षक यु. पी. शिंदे यांना प्राचीच्या घरी पाठवून सांत्वन करून तिला परीक्षेस बसण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी पाठविले.

या दोन्ही शिक्षकांनी ताठे कुटुंबियांचे सांत्वन करून प्राचीचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून तिने परीक्षा द्यावी, असे मत मांडले. सुरवातीला प्राची तयार होत नव्हती. मात्र शिक्षकांसह कुटुंबियांनी तिला परीक्षा न देता होणारे नुकसान टाळण्याबाबत सांगितले. त्यानंतर तिने धैर्याने परीक्षा दिली.

प्राचार्य आर. बी. बेंद्रे, उपप्राचार्य आर. बी. लोंढे, पर्यवेक्षक बी. ए. भालसिंग, जी. ए. भावे, वर्गशिक्षक ए. ए. पाठक, क्रीडा शिक्षक यू. पी. शिंदे यांनी प्राचीला परीक्षेला आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

प्राचीच्या जीवनातील हा अतिशय दुःखद प्रसंग होता. आज तिचा दहावीच्या बोर्डाचा पेपर होत. अशावेळी मी व माझे सहकारी यू. पी. शिंदे यांनी तिच्या घरी जाऊन तिला परीक्षेला बसण्यासाठी तिच्या पालकांशी चर्चा केली. त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून अंत्यविधीनंतर प्राचीला परीक्षेला पाठविले. तिच्या धैर्याचे कौतुक करावे, तेव्हढे कमीच आहे.

- ए. ए. पाठक, वर्ग शिक्षक.

दुःखाचा डोंगर कोसळेला असतानाही प्राची ताठे या विद्यार्थिनीने दहावीचा पेपर दिलेला आहे. तिच्या धैर्याचे व तिचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. या तिच्या निर्णायाने तिचे एक वर्षाचे होणारे नुकसान टळले आहे.

- राजेंद्र बेद्रे, प्राचार्य, भिंगार हायस्कूल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT