MLA Balasaheb Patil
MLA Balasaheb Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : पालकमंत्री नसल्याचा राज्याच्या कारभारावर परिणाम... बाळासाहेब पाटील

सरकारनामा ब्युरो

कराड : राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्याला पालकमंत्री असणे आवश्यक आहे. त्यांच्या सहीव्दारे विविध खर्चाला मान्यता, कोणताही प्रस्ताव त्याच्या सहीने जातो. मात्र, पालकमंत्र्यांची नेमणूक नसल्यामुळे अडचणी निर्माण होत असून त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर झाल्याचे दिसुन येत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी शिंदे गट शिवसेना भाजप युती सरकारवर केली आहे.

लम्पी आजारासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आमदार पाटील यांनी कराडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्याला पालकमंत्री असणे आवश्यक आहे. त्याच्या सहीव्दारे विविध शासकिय खर्चाला मान्यता मिळते. तसेच कोणताही प्रस्ताव त्याच्या सहीने जातो.

कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक बाबी होतात. मात्र, पालकमंत्र्यांची नेमणुक नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर झाल्याचे दिसून येत आहे. लंम्पी आजाराबाबत ते म्हणाले, हा आजार राजस्थानमधून आला असून कोरोना आला त्यावेळी लोकांना तीव्रता लक्षात आली नाही. तशी स्थिती लंम्पी आजाराची दिसत आहे.

वेळीच त्याची दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्या आहेत. येत्या ऑक्टोंबरमध्ये साखर कारखाने सुरू करण्याची तयारी सुरू आहे. जर जनावरे लसीकरण करुन आणली तर ती प्रादुर्भाव होणार नाही. जत, आटपाडी भागातील मजुर खिलार बैल, गाईंची जोपासणा करतात.

बैलगाडीबरोबर ते जनावरांना घेवुन येतात. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साखर हंगाम सुरु करण्यासंदर्भात शुक्रवारी मंत्री समितीची बैठक आहे. त्यामध्ये साखर हंगामाबरोबरच बैलगाडीव्दारे वाहतुक कऱणाऱ्या जनावरांचीही माहिती मांडुन सरकारला आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी करू, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT