Balasaheb Patil, Dr. Atul Bhosale, Udayasinh Patil
Balasaheb Patil, Dr. Atul Bhosale, Udayasinh Patil karad reporter
पश्चिम महाराष्ट्र

एका मंत्र्यांचे जिल्हा बँकेतील भवितव्य फडणवीस यांच्या आदेशावर ठरणार

संभाजी थोरात

सातारा : राज्यातल्या सत्तेत एकमेकांबरोबर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील कराड सोसायटी मतदार संघात एकमेकांविरोधात उभे आहेत. विशेष म्हणजे या संघर्षात भाजपा ज्याच्या बाजूने आपलं मत टाकेल त्याच पारडं जड होणार आहे. त्यामुळे राज्याचे सहकार मंत्री आणि माजी सहकार मंत्र्यांचा गट यांच्या संघर्षात भाजपच्या भूमिकेला महत्व आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत सगळ्यांचे लक्ष आहे ते सहकार मंत्री बाळासाहेब पाटील उमेदवार असलेल्या कराड सोसायटी मतदारसंघाकडे. या मतदारसंघात नेहमी माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर याचे वर्चस्व होते. नुकतंच त्याच निधन झाल्याने आता त्यांचे पुत्र, काँग्रेस नेते ॲड. उदयसिंह पाटील उमेदवार आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. एका- एका मतांसाठी दोन्ही उमेदवार धडपडत आहेत.

या मतदारसंघात भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांचीही ताकद आहे. त्यांनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केलेली नाही, मात्र, या मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या भूमिकेला महत्व आहे. ते ज्या बाजू कौल देतील त्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच या मतदारसंघातील भवितव्य भाजपाच्या हातात आहे. भाजप काय भूमिका घेणार सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपनेही ही चुरस पाहून आपले मतदार सहलीवर पाठवले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT