Nagar urban bank
Nagar urban bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर अर्बन बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर : अहमदनगर शहरातील 100 वर्षांपेक्षाही अधिक काळपासून असलेली नगर अर्बन बँक ( Nagar Urban Bank ) ही मोठ्या आर्थिक संकटातून जात असतानाच त्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बँकेत सुमारे दीडशे कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (The Financial Crimes Branch will investigate the financial malpractice case in Nagar Urban Bank)

नगर अर्बन बँकेतील संचालक मंडळाचे अधिकार रिझर्व्ह बँकेने गोठविले आहेत. तसेच बँकेतील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. अशातच राजेंद्र ताराचंद गांधी (वय 56, रा. कोहिनूर गार्डन, माळीवाडा) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राजेंद्र गांधी यांनी बँकेने 2014 ते 2019 या काळात मंजूर केलेल्या 28 कर्ज प्रकरणांबाबत फिर्यादीत संशय व्यक्त केलेला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. नगर अर्बन बँकेतील अपहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.

राजेंद्र गांधी यांनी बँकेच्या लेखा परीक्षणाच्या अहवालासह अन्य कागदपत्र कोतवाली पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले आहेत. अर्बन बँकेतील अपहार प्रकरणी यापूर्वी दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांचा तपासदेखील आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. तपासासाठी आवश्यक असलेले दस्तावेज कोतवाली पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या तपासात काय समोर येते, यावर अहमदनगर शहरात उलटसूलट चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT