Udayanraje Bhosale, Satara palika
Udayanraje Bhosale, Satara palika sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सातारा लोडशेडिंगमुक्त होण्यासाठी पहिले पाऊल पडले...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाऊस येथील जागेत २० मेगावॅट विज निर्मितीचे उपकेंद्र मंजुर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातुन पाच कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. या कामाची लवकरच सुरवात होणार असून या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परिसर लोडशेडिंगमुक्त होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

सातारा शहराच्या विकासासाठी धोरणात्मक पाऊले उचलण्याचे संकेत इनोव्हेटीव सातारा या माध्यमातुन खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले होते. या प्रकल्पाची प्रत्यक्ष अमंलबजावणी आता सुरू झाली आहे. सातारा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील लोडशेडींगची समस्या सोडवण्यासाठी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नामुळे महावितरणने सातारा आणि ग्रामीण भागासाठी २० मेगावॅटचे विजनिर्मिती करणारे उपकेंद्र मंजुर केले आहे.

सातारा नगरपालिकेच्या मालकीचे यवतेश्वर घाट परिसरात पॉवर हाऊस जलशुद्धीकरण केंद्र आहे. येथे विज निर्मितीचे छोटेखानी युनिट चालवले जात होते. या परिसरात २० मेगा वॅट उपकेंद्रासाठी १५ गुंठे जागा देण्याचे धोरण निश्चित केले आहे. या उपकेंद्राच्या निर्मितीमुळे सातारा शहर आणि परिसर येथील पुढील २५ वर्षासाठी विजेची समस्या सुटणार आहे.

उदयनराजेंनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले की, कण्हेर पाणीपुरवठा योजना व कास पाणीपुरवठा व तत्सम कारणासाठी जी वीज, शेंद्रे एक्सप्रेस फिडरकडुन घ्यावी लागते. त्याचा सर्वोत्तम पर्याय या उपकेंद्रामुळे होणार आहे. विविध पाणी उपसा योजनांना सुद्धा येथुन वीज कनेक्शन देणे शक्य होणार आहे. महावितरण व सातारा नगरपालिका यांची समन्वयातुन हा प्रकल्प उभारला जात असुन या प्रकल्पाचा सातारा शहरासाठी आणि शहर ग्रामीण भागातील लघु उद्योजकांसाठी विशेष फायदा होणार आहे.

एकीकडे लोडशेडींगमुळे सातारा औद्योगिक वसाहतीचे नूकसान होत आहे. मात्र, २० मेगा वॅटच्या वीजनिर्मिती उपकेंद्रामुळे शहरात छोट्या लघुउद्योजकांना मोठा वाव मिळणार आहे. विकास हे सातारा विकास आघाडीचे मुख्य धोरण राहिले आहे. कास धरणाच्या उंची प्रकल्पानंतर २० मेगावॅट उपकेंद्र मंजुर करून देणे हे आमचे उद्दीष्ट राहिले होते. या प्रकल्पात महावितरण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. साताऱ्यात कोणत्याही मुलभुत आणि पायाभुत सुविधांची कमतरता भासरणार नाही या करीता आम्ही वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT