Sadabhau Khoat
Sadabhau Khoat sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सरकारने ऊस नियंत्रण कायदा मातीत घातला... सदाभाऊंचा घाणाघात

- जयंत पाटील

कोपर्डे हवेली : साखर कारखानदार चोर असल्यामुळेच एकरकमी एफआरपी आम्ही मागतो आहोत. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने ऊस नियंत्रण कायदा मातीत घातला आणि एफआरपीचे दोन तुकडे केले आहेत, असा आरोप माजी मंत्री, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला.

पार्ले (ता. कराड) येथे 'जागर शेतकऱ्यांचा.. आक्रोश महाराष्ट्राचा...' या अभियानातंर्गत शेतकरी मेळावा झाला. यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य सागर शिवदास, भारतीय किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, रयत क्रांती सघटनेचे सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, प्रकाश साबळे, पार्लेचे सरपंच आश्विनी मदने, उपसरपंच मोहन पवार, पांडुरंग कोठावळे, राजमाची सरपंच शिवाजी डुबल, स्वातंत्र्य सैनिक शंकर पवार उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले, राज्यात शेतकरी, युवकांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकारने गहू, तांदूळ फुकट देऊन शेतकऱ्यांच्या मालाची माती केली. कोरोना काळात सरकारने ऑक्सिजन, बेडमध्ये पैसे खाल्ले कोणालाही मोफत औषध उपचार मिळाले नाहीत. एमपीएससीच्या परीक्षा थांबवल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा तरी कशाला सरकारने पोलिस भरतीत घोटाळा केला.

सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते म्हणून एकही वीज कनेक्शन तोडले नाही. मात्र, कोरोना काळात शेतकऱ्यांना वीजमाफी देणे गरजेचे होते. केवळ दहा ते पंधरा हजार कोटींचा प्रश्न होता. परंतू ते केले नाही. यांनी बॅंका, दूधसंघ, कारखाने, सुतगिरण्या सारख्या संस्था खाल्ल्या. या सरकारचे सर्व मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. यावेळी रामकृष्ण वेताळ, सचिन नलवडे यांची मनोगते झाली. आप्पासासहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कृष्णा मदने यांनी आभार मानले.

सचिन नलवडेंची निवड

पार्ले येथे घेतलेल्या जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियानातंर्गत घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सचिन नलवडे यांची पश्चिम महाराष्ट्र रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांचा सत्कारही झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT