Kiran Lahmate News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kiran Lahmate News : अजितदादांच्या 'देवगिरी' बंगला बैठकीची इनसाईड स्टोरी; स्टँपवर सह्या घेतल्या; आमदार लमहाटे म्हणाले..

Kiran Lahmate on Ajit Pawar News : लमहाटेंनी अजित पवारांना हात जोडून मतदासंघाकडे निघाले.

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करण्यापूर्वी आणि शपथविधिचा सोहळा पार पडण्यापूर्वी देवगिरी या बंगल्यावर पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, अमोल कोल्हे उपस्थित होते.

या बैठकीला कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे यांनी बैठकीतून जाताना, कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं, याबाबत चर्चा होत आहे, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लहमाटे उरस्थित होते. बैठकीत नेमकं काय घडलं, याबाबत आता लहमाटे यांनी खुलासा केला आहे. (Latest Marathi News)

नगर जिल्ह्यातील अकोले या मतदारसंघाचे आमदार यांनी या बैठकीतील आतमधली गोष्ट एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितली आहे. लहामाटे यांना प्रश्न विचारण्यात आलं की, शपथविधीला तुम्ही उपस्थित होतात, काय तो घटनाक्रम होता? ' यावर लमहाटे म्हणाले, "अजित पवार यांनी देवगिरीवरील बैठकीच्या एक दिवस आधी सकाळी दहा वाजता मला फोन केला. मुंबईत या मला बोलायचं आहे तुमच्याशी, असं त्यांनी म्हंटलं. त्यानुसार मी पहाटे प्रवास करत सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबईला पोहचलो. तिथे मला आमचे पक्षाचे काही आमदार भेटले. यावेळी अजित पवारांशी मी मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा केली. दुपारी १ वाजता अजित पवार बाहेर आले. म्हणाले, तुमच्या मतदारसंघातील अनेक कामं आहेत, ते पूर्ण करायचं असेल तर आपल्याला सत्तेत जावं लागेल. त्यावेळी दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ, प्रफुल पटेल असे बरेच नेते तिथे उपस्थित होते. आणि मला वाटलं की अध्यक्ष शरद पवारांचीच याला संमती असावी, म्हणून आम्ही स्टॅम्पवर आत जावून सह्या केल्या."

लमहाटे पुढे म्हणाले, "मी अजित पवारांना म्हंटलं की, पक्षाचा हिताचा निर्णय घ्या. आम्ही आतमध्ये जावून स्टॅम्प पेपर सही केली आहे. बाहेर आल्यावर मला खासदार सुप्रिया सुळे भेटल्या. सुप्रिया ताई खासदार अमोल कोल्हेंशी बोलत होत्या, अजित पवार हे आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, अशी चर्चा कानावर आली. पण हे सगळं इतक्या लवकर होईल हे माहिती नव्हतं."

"आमचे पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी बोलले की, याला शरद पवार यांची संमती आहे का? चव्हाण म्हणाले की, बहुतेक संमती असावी. मग थोड्या वेळात सांगण्यात आलं की, आपल्याला राजभवनात जायचं आहे. दोन वाजता शपथविधी आहे. राजभवनात पावनेदोन वाजण्याच्या सुमारास पोहचलो. शपथविधीची प्रक्रिया सुरू झाली. आमच्याबरोबर धर्मरावबाबा आत्राम हे होते. ते ही शपथ घेणार आहेत, हे आम्हाला माहिती नव्हतं. आणि शपथविधी झाल्यानंतर शरद पवारांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली. तेव्हा आम्हाला समजलं की, शरद पवारांचं याला समर्थन नाही,"असं स्पष्टीकरण लमहाटे यांनी दिली आहे.

"मी अमोल कोल्हेंना म्हंटलं की, आता तर धर्मसंकट उभं राहिलं. राजकारण कुणासाठी करायचं, तर जनतेसाठी करायचं. मग मी निर्णय घेतला. थोड्या वेळात मी अजित पवारांना हात जोडला. त्यांना म्हंटलं की, 'दादा मी चाललो मतदारसंघात.'दादाही म्हणाले, "आता जा तुम्ही." मग मी मतदारसंघात निघून आलो. मतदारसंघात येत असताना शरद पवार साहेबांचा फोन आला. निरोप मिळाला की, पाच तारखेच्या बैठकीला या. आता पाच तारखेच्या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे, असे किरण लमहाटे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT