N. D. Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कर्मवीरांचा वारसा चालविणारा कर्मयोगी हरपला...

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक सामाजिक व राजकीय नेत्यांनी एन.डी. पाटील यांना शब्दसुमनांजली अर्पण केली.

सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) - शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन.डी.पाटील ( N. D. Patil ) यांनी सोमवारी 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी रयत शिक्षण संस्थेतही मोठे भरीव काम केले. होते. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक सामाजिक व राजकीय नेत्यांनी एन.डी. पाटील यांना शब्दसुमनांजली अर्पण केली.

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मिनाताई जगधने म्हणाल्या, प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा निस्वार्थीपणे पुढे चालविणारा कर्मयोगी हरपला. रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टीने फार मोठी हानी झाली. त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला.

त्या पुढे म्हणाल्या की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा मी राखणदार आहे. या संस्थेचे मी डोळ्यात तेल घालून राखण करणार, ही संस्था मोठी करणार असे ते वारंवार सांगायचे. त्यानुसार त्यांनी संस्थेसाठी मोठे योगदान दिले. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले, अशी प्रतिक्रिया मिनाताई जगधने यांनी व्यक्त केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि माजी मंत्री प्रा.एन.डी.पाटील यांच्या निधनाने शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारा कणखर नेता महाराष्ट्राने गमावला. सरकार कोणत्याही पक्षांचे असो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आपली स्पष्ट मत मांडली. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. सामाजिक चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले.

रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वारसा पुढे चालविण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यात शेकाप चे ज्येष्ठनेते प्रा.एन.डी.पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. माजी खासदार कै.शंकरराव काळे आणि त्यांचे निकटचे संबंध होते. या दोघांनी रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी मोठे योगदान दिले. प्रा.पाटील यांनी समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवीला. शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी दिलेले लढे कुणीही विसरणार नाही. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे आणि राजकारणाचा स्तर उंचावणारे कणखर व्यक्तिमत्व हरपले, असे आमदार काळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT