Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे बंधाऱ्याला गळती

सुहास वैद्य

कोल्हार ( जि. अहमदनगर ) - राज्यात सध्या महाविकास आघाडी व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. अशा स्थितीत प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला लागलेल्या गळतीवरून भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. The leakage of the embankment due to the negligence of the state government

आमदार विखे पाटलांनी बंधाऱ्याची काल ( शुक्रवारी ) पाहणी केली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. भास्करराव खर्डे, विद्यमान सदस्य दिनेश बर्डे, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता व प्रशासक अरुण नाईक, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, नंदकुमार खांदे, दत्ता पाटील शिरसाठ, दीपक शिरसाठ, बाबासाहेब दळे, साहेबराव दळे, भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रेय राजभोज, उपसरपंच प्रकाश द. खर्डे, रावसाहेब खर्डे, स्वप्निल निबे, सुनील शिंदे, श्रीकांत खर्डे, धनंजय दळे, महेश शिरसाठ, निवृत्त शाखा अभियंता संजय गणेश उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीस राज्य सरकार व शासकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे. त्याची चौकशी होत राहील. परंतु त्याआधी गळती थांबविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.तोपर्यंत पाणी अडविण्यासाठी पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

त्यांनी विविध पदाधिकारी, लाभधारक शेतकरी व संबंधित अधिकार्‍यांसमवेत बंधाऱ्याची पाहणी केली.बंधाऱ्यातून होणाऱ्या पाण्याची गळती पाहून ते आवक झाले.लाभधारक शेतकऱ्यांनी पाण्याच्या गळतीमुळे होणाऱ्या नुकसानीचा पाढा त्यांच्यापुढे वाचला.पाहणी केल्यानंतर विखे यांनी 'सरकारनामा' प्रतिनिधीशी बोलताना बंधाऱ्याच्या गळती बाबतची प्रतिक्रिया दिली.

पाहणी दरम्यान नाईक यांनी सांगितले, की बंधाऱ्याचा दोन्ही तिरावरील भराव व खालील बाजूस दगडी अस्तरीकरण, वरच्या बाजूला काळीमाती भरण्याबाबत नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पनचित्र संघटना यांच्याकडून डिझाईन घेण्याची प्रक्रिया चालू आहे. त्या प्रस्तावाला सुधारित मान्यता घेतल्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील.

त्यावर विखे पाटील म्हणाले, प्रस्तावाच्या मंजुरीस विलंब लागू शकतो. तोपर्यंत बंधाऱ्यातील पाणी वाहून न जाऊ देता लाभधारकांना पाण्याचा फायदा होण्यासाठी विखे पाटील साखर कारखान्यामार्फत आवश्यक त्या पर्यायी तांत्रिक उपाययोजना करू. त्याचे काम सुरू करण्याच्या सूचनाही विखे यांनी कारखान्याचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिल्या.

बंधाऱ्यातील पाण्याचा प्रवरानदीकाठच्या सुमारे बाराशे हेक्टरवरील शेतजमिनींना फायदा झाला आहे. आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याच्या क्षारांचे प्रमाणही कमी झाले आहे. भंडारदरा व निळवंडे धरणात एकूण सुमारे 15 ते 16 टीएमसी पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात बंधारे भरून घेण्यासाठी मी व्यक्तिशः लक्ष घातले आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये.

- आमदार राधाकृष्ण विखे पाटील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT