अहमदनगर : अहमदनगर महापालिकेकडून अनेक कामांच्या केवळ घोषणा होत आहेत. प्रत्यक्ष ही कामे सुरू होताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांबरोबरच आता सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवकही वैतागले आहेत. महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त शंकर गोरे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी शहरात होताना दिसत नाही. The mayor, the commissioner's order to the officer-staff basket
बोल्हेगाव-नागापूर परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राची 26 ऑक्टोबरला पाहणी करत महापौर आणि आयुक्तांनी तेथील गवत काढून साफसफाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी महापौर आणि आयुक्तांचे आदेश जुमानत नसतील तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटणार, असा संतप्त सवाल महापालिकेचे सभागृह नेते तथा शिवसेनेचे नगरसेवक अशोक बडे यांनी केला आहे.
बोल्हेगाव-नागापूर परिसरातील प्रलंबित कामाचा आढावा महापौर रोहिणी शेंडगे यांनी आज (गुरुवारी) सभागृह नेते अशोक बडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी बडे यांनी प्रशासकीय अधिकार्यांना जाब विचारला.
या बैठकीत फेज-2 चे रखडलेले काम, परिसरातील लाईटचा प्रश्न, संत नागरगोजे भवन नूतनीकरण, सन फार्मा चौक ते आंबेडकर चौक दरम्यान गटार बांधणे, गणेश चौकात औषध फवारणी करणे, नागापूर गावठाण स्मशानभूमीला संरक्षक भिंत बांधणे, जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करणे, प्रभाग समिती कार्यालयात नळकनेक्शनचे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नागापूर गावठाण ओढ्याजवळील जुन्या शौचालयांच्या दरवाजे आणि छताला पत्रे मारणे, नागापूर स्मशानभूमीत पत्र्याचे दोन शेड करणे, विद्युत पोलवर फिटींग करणे, फेज-2 पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करून आढावा घेण्यात आला आहे.
या बैठकीस शहर अभियंता सुरेश इथापे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. शंकर शेडाळे, दत्ता सप्रे, अतिक्रम विरोधी विभागाचे प्रमुख कल्याण बल्लाळ, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर. जी. सातपुते, सचिन राऊत, किशोर देशमुख, रितेश अग्रवाल, भालचंद्र भाकरे, लोभाजी कातोरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.