Shambhuraj Desai
Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पहिलवानांच्या दोन दिग्गज घराण्यातील मतभेद गृहराज्यमंत्री दूर करणार

Umesh Bambare-Patil

सातारा : स्वागत कमानीला विरोधावरून पवार आणि जाधव कुटुंबात मतभेद निर्माण झाले आहेत. यावरून जिल्हा तालीम संघाशी संबंधित पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेद दूर करण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर जिल्हा तालीम संघाचा एक विश्वस्त व शासनाचा प्रतिनिधी म्हणून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई हे मध्यस्ती करणार आहेत. तसेच या दोन कुटुंबियांची बैठक घेणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहु क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा उत्साहात सुरु आहे.

पण, ऑलम्पिक वीर कै. श्रीरंग जाधव यांचे मोठे योगदान असून त्यांच्या नावाच्या स्वागत कमानीला तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार व त्यांच्या चिरंजीवांनी विरोध केला होता. यावरून या जाधव कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन साहेबराव पवार कुटुंबियांकडून घराणेशाही सुरू असल्याचा आरोप करत स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. आता या दोन कुटुंबातील वाद मिटविण्याची जबाबदारी जिल्हा तालीम संघाचे विश्वस्त व शासनाचे प्रतिनिधी म्हणून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ते स्पर्धेनंतर बैठक घेणार आहेत.

जिल्हा तालीम संघाची स्थापना करण्यात लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह भोसले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण, (कै.) पैलवान श्रीरंग जाधव, साहेबराव पवार यांच्यासह तत्कालीन पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पवार आणि जाधव कुटुंबातील मनभेद दूर करण्यासाठी जिल्हा तालीम संघाचा एक विश्वस्त व शासनाचा प्रतिनिधी म्हणून लवकरच बैठक घेणार असल्याचेही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT