MNS activists in Sangamner
MNS activists in Sangamner Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मनसेचे लोक ताब्यात घेतले अनं न्यायालयाच्या आदेशाने सोडून दिले

अमित आवारी

अहमदनगर - राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. उद्या (मंगळवारी) ईद असल्याने संगमनेर पोलिसांनी प्रतिबंधक उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपजिल्हाध्यक्षांसह 11 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे या कार्यकऱ्यांना सोडून द्यावे लागले. ( The MNS men were taken into custody and released on a court order )

मशिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी 4 एप्रिलपर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्याचे अल्टिमेटम दिले आहे. त्यांनी काल ( रविवारी ) औरंगाबाद येथे मोठी सभा घेतली. उद्या (मंगळवारी) मुस्लीम बांधवांचा ईद सण आहे. तसेच हिंदू बांधवांची अक्षयतृतीया आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

समाजातील जातीय सलोखा अबाधित रहावा यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय घेण्यास सुरवात केली. त्यांनी संगमनेर शहरातील 20 कार्यकर्त्यांना नोटिसा, 16 जणांचे हमीपत्र व सात जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शिवाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह 11 जणांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. बचाव पक्षातर्फे भाजपचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सरकार व बचाव पक्ष दोन्हीची बाजू ऐकून घेतल्यावर मनसेच्या त्या 11 जणांना सोडून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारी पक्षाने ताब्यात घेतलेल्यांकडून हमीपत्र भरून घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली.

या 11 जणांत मनसेचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष शरद ज्ञानदेव गोर्डे (वय 42, रा. वडझरी बुद्रुक), तालुका प्रमुख अशोक सवरग्या शिंदे (वय 32, रा. वैदुवाडी), शहरप्रमुख तुषार विजय ठाकूर (वय 32, रा.रहाणेमळा), अविनाश हौशीराम भोर (वय 46, रा.चैतन्यनगर), संदीप रंगनाथ आव्हाड (वय 32, रा.वाडेकर गल्ली), दिलीप साहेबराव ढेरंगे (वय 27, रा.समनापूर), प्रमोद अशोक काळे (वय 31, रा.लक्ष्मीनगर), दर्शन बाबाजी वाकचौरे (वय 37, रा.मेहेरमळा), संकेत सुभाष लोंढे (वय 28, रा.गणेशनगर), अभिजीत अशोक कुलकर्णी (वय 37, रा. मालपाणी नगर) व रामा चंद्रभान शिंदे (वय 19, रा.वैदुवाडी) यांचा समावेश आहे.

मी काल (रविवारी) औरंगाबादला गेलो होतो. रात्री उशिरा घरी परतलो. सकाळी पोलिसांनी आम्हा मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिसांनी कोणतीही कल्पना न देता आम्हाला न्यायालयात हजर केले.

- शरद गोर्डे, उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष, मनसे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT