Devendra Fadanvis, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : पाणीप्रश्न सोडविल्‍याशिवाय येणारी विधानसभा लढणार नाही : जयकुमार गोरे

Jaykumar Gore उत्तर माणमधील २१ गावांना जिहे-कठापूरचे पाणी मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा झाला. या वेळी आमदार जयकुमार गोरे बोलत होते.

Umesh Bambare-Patil

-विशाल गुंजवटे

Satara Latest News : माण-खटावच्या मातीला दुष्काळमुक्त करायचंय... हेच स्वप्न घेऊन मी मतदारसंघात आलो. आज उरमोडी योजनेतून ९५ गावांना पाणी जातंय. उत्तर माणमधील १६ गावांचे जिहे-कठापूरमधून काम सुरू आहे. कुकुडवाडसह ४४ गावांसाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन त्याही गावांचा पाणीप्रश्न सोडवतोय. या २१ गावांचे काम चालू केल्याशिवाय येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा संकल्प आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे.

बिजवडी येथे उत्तर माणमधील २१ गावांना Maan Taluka जिहे-कठापूरचे पाणी मंजूर केल्याबद्दल कृतज्ञता सोहळा झाला. या वेळी आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore बोलत होते. या वेळी उत्तरमाणच्या २१ गावांच्या वतीने जयकुमार गोरे यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण करत सत्कार करण्यात आला.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘२०१९ मध्‍ये आंधळी धरणातून उचलून या भागाला पाणी देणार, हा शब्द दिला होता. या योजनेचे भूमिपूजन करून कामही सुरू करून दाखवले. जुलै महिन्यापर्यंत हिंगणीला पाणी जातेय. या गावांचा या योजनेत समावेश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नवीन योजना मंजूर केली.

ही योजना अंदाजे साडेपाचशे ते पावणेसहाशे कोटी रुपयांची आहे. २४ तास लबाडाच्या संगतीत राहणाऱ्यांना लबाडीच दिसणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना दिला. या वेळी अरुण गोरे, अर्जुन काळे, दादासो काळे, हरिभाऊ जगदाळे, बाबासो हुलगे, सोमनाथ भोसले, संजय गांधी, अतुल जाधव, सिद्धार्थ गुंडगे, अक्षय महाराज भोसले, मामूशेठ वीरकर, तुकाराम भोसले, विठ्ठलराव भोसले, उत्तर माणतील प्रमुख, ग्रामस्थ उपस्थित होते. Maharashtra Political News

मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी ऐतिहासिक आंदोलने करण्यात आली. मात्र, आजपर्यंत शरद पवार Sharad Pawar यांच्यासह अनेकजण मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले. मात्र, एकानेही आरक्षणाविषयी एकही शब्द काढला नाही; पण या समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता, अन्‌ आपलेच सरकार या मराठा, धनगर समाजबांधवांना आरक्षण देईल.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT