Dr. Sujay Vikhe Patil News, Balasaheb Thorat News, Ahmednagar News in Marathi
Dr. Sujay Vikhe Patil News, Balasaheb Thorat News, Ahmednagar News in Marathi Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब थोरातांच्या घरात कोणाशी बोलायचे हा माझ्यासमोर प्रश्न

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांची 'सरकारनामा'ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विखे-थोरात संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न का निष्फळ ठरत आहे. या बाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. हे वक्तव्य जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. ( The question before me is who to talk to in Balasaheb Thorat's house )

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, कुठलीही गोष्ट होण्यासाठी जुन्या काळातील राजकारणी व नवी पिढी महत्त्वाची असते. ज्येष्ठ नेते शरद पवार व माझ्या आजोबांत मोठा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. उपमुख्यमंत्री अजित पवार व माझ्य वडिलांतील वाद मुळा-प्रवरा विद्युत प्रकल्पावरून झाला. मात्र जेव्हा पुढची पिढी आली; मी, रोहित पवार, पार्थ पवार. आम्ही जेव्हा अनौपचारिक भेटतो-बोलतो तेव्हा कटुता कमी होते. विखे परिवाराकडून माझ्याशी संभाषण करता येते मात्र त्यांच्या परिवाराशी संभाषण करायचे कोणाशी. त्यामुळे कटुता आहे. (Ahmednagar News in Marathi)

ते पुढे म्हणाले की, माझे वडील व बाळासाहेब थोरातांतील कटुत्व ही जुन्या काळातील विषय आहे. ते दोघे झालेला त्रास कसे विसरतील यात मी पडणार नाही. मी पुढाकार घ्यायचा ठरला तरी त्यांच्याकडून संवाद करायचा कोणाशी? त्यामुळे संवाद होत नाही. त्यांच्या घरात एवढे मोठे राजकारण आहे की, त्यांच्या भगिनी नगराध्यक्षा, भाचा युथ काँग्रेसमध्ये, त्यांचे मेहुणे आमदार, त्यांचे जावई दूध संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा एक पुतण्याही राजकारणात आला आहे, मग चर्चा करायची कोणाशी? त्यामुळे संवादपेक्षा गैरसमज होण्याचीच शक्यता जास्त. वडिलांचे मत परिवर्तन केवळ मुलगा अथवा मुलगी करू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की, मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. निवडणूक लढवून विजयी झालो. त्यांना माझ्या कर्तृत्त्वावर विश्वास बसला. तसे बहुतांश वेळा नवीन पिढी जुन्या पिढीचे मत परिवर्तन करण्यात यशस्वी होते. मात्र थोरातांबरोबर तसे नाही. त्यांनी त्यांचा वारसदार निश्चित करावा. त्यानंतर चर्चा करता येईल. माझी संवाद करायची तयारी आहे. व्यक्तिगत मनात कटुता ठेऊन, पक्षाच्या पलिकडे जाऊन भूमिका कधी कधी घेतली जाते. ती थांबली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT