Shankarrao Gadakh
Shankarrao Gadakh Vinayak Darandale
पश्चिम महाराष्ट्र

गडाखांच्या मळ्यात घुमला 'जय भवानी'चा नारा

विनायक दरंदले

सोनई ( अहमदनगर ) : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या बॅट चिन्हावर शंकरराव गडाख आमदार झाले. भाजप व शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या ओढताणीत त्यांनी शिवबंधन हातात बांधत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंधारण मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी शिवसंवाद व घोंगडी बैठकीच्या माध्यमातून शिवसेना पक्ष वाढ सुरु केली. The slogan of 'Jai Bhavani' was heard in the garden of Gadakh

मागील वर्षी कोरोना स्थितीमुळे गडाखांच्या वस्तीवर दिवाळी फराळ कार्यक्रम झाला नव्हता. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मळ्यातील वस्तीवर प्रथमच दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या निमित्ताने 'जय भवानी जय शिवाजी'चा नारा घुमला. जिल्ह्यातून आलेले शिवसैनिक व तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची मोठी फौज शिवसेना पक्षासाठी 'मिले सूर मेरा तुम्हारा' प्रमाणे ठरली आहे.

आज सकाळी दहा वाजता फराळ कार्यक्रम सुरू झाला. लोहगाव रस्त्यावरील गडाख वस्तीला जत्रेचे स्वरुप आले होते. घरासमोर मोठा मंडप टाकण्यात आला होता. येथे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, सेवा संस्था अध्यक्ष विश्वास गडाख व माजी पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख बसून होत्या. समोरच्या चिक्कूच्या बागेत मंत्री गडाख, जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख व युवानेते उदयन गडाख कार्यकर्ते व शिवसैनिकांना भेटून शुभेच्छा देत होते.

नगर, कर्जत, राहुरी, श्रीरामपूरसह अन्य तालुक्यातून आलेले शिवसैनिकांनी 'जय भवानी जय शिवाजी' चा जयघोष करत मंत्री गडाखांना भेटत होते. जय महाराष्ट्र म्हणत एकमेकांच्या भेटी होत होत्या. दुपारपर्यंत खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, शिवसेना नगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, भगवान फुलसौंदर, कमलाकर कोते यांनी फराळ कार्यक्रमास भेट दिली. दुपारनंतर गर्दीचा ओघ सुरुच होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT