Indoli : tractor was set on fire.  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

FRP : ऊसदराची ठिणगी साताऱ्यात; इंदोलीजवळ ऊसाचा ट्रॅक्टर पेटवला...

कोल्हापुर kolhapur, सांगली Sangali जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा सातारा Satara जिल्ह्यातील साखर कारखाने Sugar factory ऊसदर FRP कमी देत आहेत.

हेमंत पवार

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (गुरुवारी) आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. तरीही ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला मध्यरात्रीच्या सुमारास आग लावण्यात आली. त्यामुळे सातारा जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची ठिणगी पडली आहे. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

कोल्हापुर, सांगली जिल्ह्यातील जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने ऊसदर कमी देत आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेवुन १७ आणि १८ नोव्हेंबरला ऊसतोड आणि ऊस वाहतुक बंदचे आंदोलन पुकारले होते.

मात्र, तरीही इंदोली गावाजवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर कारखान्याला ऊस वाहतुक करत असल्याने अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री ट्रॅक्टरच पेटवला आहे. त्याची माहिती समजताच ऊंब्रज पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगीतले. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदर आंदोलनचा ठिणगी पडली असुन आता हे आंदोलन वाढणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT