Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा राज्य सरकारला विसर

सतीश वैजापूरकर

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - देशात काल ( शनिवारी ) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्‍य साधून लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा विषय काढत महाविकास आघाडीवर ( Mahavikas Aghadi ) टीका केली. ( The state government has forgotten the memorial of Chhatrapati Shivaji Maharaj in the Arabian Sea )

यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून मानवंदना देण्‍यात आली. माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालिनी विखे पाटील, सिनेट सदस्‍य अनिल विखे, नंदू राठी, सरपंच कल्‍पना मैड, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, संपतराव विखे यांच्‍यासह शिवजयंती उत्‍सव समितीचे पदाधिकारी, ग्रामस्‍थ उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्‍मारक उभे करण्‍यासाठी मागील भाजप सरकारने सर्वतोपरी प्रयत्‍न केले. स्‍मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. मात्र, आघाडी सरकारच्‍या काळात या स्‍मारकाबाबत कोणत्‍याही हालचाली झाल्‍या नाहीत, अशी खंत सर्वच शिवप्रेमींच्‍या मनात आहे.

ते पुढे म्हणाले की, रयतेच्‍या राज्‍याची संकल्‍पना मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक एकतेबरोबरच मानवतेच्‍या कल्‍याणाचा मंत्र आपल्‍याला दिला असल्याचे आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.

लोणी खुर्द येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाजवळ शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्‍याची घोषणा आमदार विखे पाटील यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT